पांढर्‍या सोन्यावर चोरट्यांची वक्रदृष्टी

पांढर्‍या सोन्यावर चोरट्यांची वक्रदृष्टी

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

तालुक्यात ग्रामीण भागात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने होत असलेली वाढ रोखण्यास पोलीस यंत्रणेस (Police system) अपयश येत असतांना आता चोरट्यांनी (Thief) आपला मोर्चा पांढर्‍या सोन्याकडे (White gold) वळविला आहे.

बोलठाण (bolthan) येथील शेतकरी (farmer) जगन्नाथ रिंढे यांच्या शेतातील 11 क्विंटल 20 किलो कापूस (Cotton) अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. कापसाला चांगला भाव मिळत असल्याने चोरट्यांनी तो लांबविण्यास प्रारंभ केल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यात अतिवृष्टीमुळे (heavy rain) शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात वाहून गेली तर कशीबशी उरलेली पिके जतन करून ती शेतकर्‍यांनी वाढवली आहे.

यंदा कापसाचे चांगले उत्पादन झाले असून भाव देखील समाधानकारक मिळत आहे. त्यामुळे सुखावलेल्या कापूस उत्पादकांची (cotton growers) चिंता चोरट्यांनी वाढवली आहे. चांगला भाव असल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा कापसाकडे वळविला असून तालुक्यातील बोलठाण येथील शेतकरी जगन्नाथ रिंढे यांच्या मळ्यातील पत्र्याच्या पोल्ट्री (Poultry) शेडमध्ये साठवलेला 98,560 रुपये किमतीचा 11 क्विंटल 20 किलो कापूस अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Crime Filed) करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वाघमारे हे अधिक तपास करीत आहेत. तालुक्यात घरफोडीसह वाहनचोरीच्या घटना वाढल्या आहेत. आता चोरट्यांनी शेतमालाकडे मोर्चा वळवला. त्यामुळे शेतकर्‍यांसह व्यापार्‍यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून या चोरट्यांचा त्वरीत बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com