करोनाची दुसरी लाट तरुणाईसाठी ठरली घातक

सव्वाशे दिवसांत 97 हजार बाधित
करोनाची दुसरी लाट तरुणाईसाठी ठरली घातक

नाशिक । वैभव कातकाडे Nashik

जिल्ह्यात करोना ( Corona ) प्रादुर्भावाची दाहकता कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. 16 फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या दुसर्‍या लाटेत ( Second Wave Of Corona ) 97 हजार तरुण बाधित झाले. त्यामुळे ही लाट तरुणांसाठी घातक ठरली आहे. पहिल्या लाटेत 40 हजार तरुण बाधित झाले होते. आरोग्य प्रशासनाच्या आकडेवारीतून हे वास्तव उघड झाले आहे.

जिल्ह्यात करोनाचा पहिला रुग्ण 28 एप्रिलला आढळला होता. त्यावर यशस्वी उपचार होऊन तो करोनामुक्त झाला होता. मात्र कालांतराने निर्बंध शिथिल होत गेले आणि संसर्गवाढीस सुरुवात झाली. पहिल्या लाटेत म्हणजेच 28 एप्रिल ते 15 फेब्रुवारी या 293 दिवसांत 0 ते 12 या वयोगटातील 6,121 बालके बाधित होती. यात 3,458 मुले तर 2,663 मुलींचा समावेश होता. 13 ते 25 या वयोगटातील 17,054 बाधित होते.

यामध्ये 10 हजार 118 मुले तर 6 हजार 936 मुलींचा समावेश होता. 26 ते 40 या वयोगटातील 39,001 एवढे बाधित होते. यात 25,410 पुरुष तर 13,591 महिला बाधित होत्या.पहिल्या लाटेत सर्वाधिक 41 ते 60 या वयोगटातील 39,580 रुग्ण बाधित झाले होते. यातदेखील 25,307 पुरुष तर 14,207 महिला बाधित झाल्या होत्या. ज्येष्ठ नागरिक म्हणजेच साठी ओलांडलेले 16,597 बाधित होते. यात 10,243 पुरुष तर 6,354 महिला बाधित झाल्या होत्या.

दुसर्‍या लाटेत 16 फेब्रुवारी ते 30 जून या 134 दिवसांत 0 ते 12 या वयोगटातील 13,240 बालकांना करोनाने पछाडले होते. 7,363 मुले तर 5,877 मुलींचा त्यात समावेश होता. 13 ते 25 या वयोगटातील 46,944 बाधितांपैकी 26,863 मुले तर 20,081 मुली होत्या. दुसर्‍या लाटेत सर्वाधिक 26 ते 40 या वयोगटातील 96,910 रुग्ण होते. त्यात 57,543 पुरुष तर 39,367 महिला होत्या.

41 ते 60 या वयोगटातील 84,208 बाधितांमध्ये 48,913 पुरुष व 35,292 महिला होत्या. साठी ओलांडलेले 34,960 जण संसर्गग्रस्त होते. त्यात 19,753 पुरुष तर 15,207 महिलांचा समावेश होता. पहिल्या लाटेत एकूण रुग्ण 1,18,353 होते. त्यात 74,536 पुरुष तर 43,817 महिला होत्या. दुसर्‍या लाटेत 30 जूनपर्यंत 2,76,262 जणांना करोनाने ग्रासले. त्यात 1,60,438 पुरुष तर 1,15,824 महिलांचा समावेश आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com