मुर्तीकारांचे अर्थचक्र कोलमडणार

मुर्तीकारांचे अर्थचक्र कोलमडणार

येवला । प्रतिनिधी Yevla

गत वर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सवावर ( Ganesh Festival ) करोनाचे( Corona ) संकट घोंगावत असल्याने मुर्तीकारांचा धंदाच मंदावला आहे. त्यामुळे सण-उत्सवा संबंधित सर्वच व्यावसायिकांचे आर्थिक गणित यंदाही कोलमडणार असल्याचे चित्र आहे.

शहर व तालुक्यात कुंभार समाजासह इतर उत्तर प्रदेश, राजस्थान येथून आलेले अनेक मूर्तिकार गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्ती बनवत असतात. शहरासह ग्रामीण भागातही गणेशमूर्ती बनविण्याचे कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये सर्व साधारणता गणेश उत्सवाच्या चार महिने आधीपासून गणेश मूर्ती बनवण्याची तयारी सुरू होते. त्यासाठी बाहेरून रंग, वाळू, माती आदी साहित्य आणले जाते.

येवल्यातील गणेशमूर्तींना नाशिक, नगर, पुणे, मुंबई, सुरत, अहमदाबाद आदी जिल्ह्यात मोठी मागणी राहते. गतवर्षीप्रमाणे यंदाही करोना प्रादुर्भावामुळे साहित्य उपस्थिती साठी मोठी अडचण निर्माण झाली. याबरोबर महागाईचे फटका बसला आहे. तर करोनामुळे मूर्तींना बाहेरील मागणी नाही. परिणामी मूर्तिकारांचे या वर्षाचे आर्थिक गणितच कोलमडणार असल्याचे चित्र आहे.

गतवर्षी ककरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा अनेक सार्वजनिक मंडळांनी निर्णय घेतला होता. यावर्षीही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. यंदा शासनाच्या अटी नियमामुळे श्री गणेश मूर्तींच्या उंचीवर मर्यादा असून, उत्सवाच्या स्वरूपावर ही मर्यादा राहतील. गतवर्षीचा अनुभव पाहता यंदा मूर्तिकारांनी दोन फुटाच्या आतील व छोट्या मूर्ती बनवाव्या लागणार आहे .

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com