शाळाच मुलांपर्यंत आली...

शाळाच मुलांपर्यंत आली...

नाशिक । शुभम धांडे Nashik

करोनाकाळात शाळा बंद (School closed during the Corona Period), त्यामुळे घरी असणारी मुले, त्यांचे थांबलेले शिक्षण यामुळे पालकही चिंतेत होते. परंतु या सर्व परिस्थितीतही मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी शाळा( Schools ), शिक्षक( Teachers ) आणि स्वतः पालकांनी अनेक प्रयत्न केले.

ज्यावेळी संपूर्ण देशात लॉकडाऊन होता त्यावेळी इतरांसारखे ही मुलेही घरीच होती. अभ्यास बंद होता. पण काही काळानंतर ऑनलाईन शिक्षण पद्धतीने शाळा सुरू झाल्या. त्यासाठी मोबाईल, इंटरनेट या मूलभूत गोष्टी गरजेच्या होत्या. काही पालकांनी मोबाईल आणि इंटरनेटची सोय केली. पण काहींना ते शक्य नव्हते.

पालकांचा ताण कमी झाला तो आश्रमशाळांच्या काही वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून. शिक्षक आठवड्यातून दोन-तीन दिवस वस्तीवर येऊन मुलांना शिकवू लागले. सरकारच्या सेतू अभ्यासक्रमाची उजळणी तर कुठे निसर्ग न्याहाळत तिथेच छोटे छोटे वर्ग भरत होते.

योजना चांगली आहे!

आश्रमशाळा योजना चांगली आहे. त्यामुळे मुलांना सहज शिकवणे शक्य होत आहे. ही योजना अशीच पुढे कायम राहो. महामारीचे प्रमाण कमी असलेल्या ठिकाणच्या शाळा सुरू होऊन मुलांचे शिक्षण सुरळीत सुरू व्हावे असे वाटते. आम्हाला नाही शिकता आले, पण आमच्या पोरांनी शिकावे.

युवराज राघव खोटरे, पालक

मुले थोडे तरी शिकताय!

मागच्या दोन वर्षांच्या काळात सगळ्या महामारीत घरून शिक्षण सुरू झाले, पण पाड्या-वस्तीवर अनेक अडचणी असतात, फोनच्या रेंजपासून ते मोबाईलच्या रिचार्जपर्यंत. त्यात काही मुले या सर्व दिवसात अभ्यासापासून दूर गेली. ते प्रवाहातून बाहेर पडू नये म्हणून काही दिवसांनी आजूबाजूच्या गावातून काही शिक्षक येऊन शिकवताय. किमान त्यामुळे मुले थोडाफार तरी अभ्यास करतात.

हरी राघव खोटरे, पालक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com