'या' दोन ग्रामपंचायतींंच्या सरपंचांना ठरविले अपात्र

विभागीय आयुक्तांनी सरपंचांंना बजावल्या नोटिसा
'या' दोन ग्रामपंचायतींंच्या सरपंचांना ठरविले अपात्र

नाशिक | प्रतिनिधी Nashik

बागलाण तालुक्यातील (Baglan Taluka )ताहाराबादच्या ( Taharabad )सरपंच शीतल नंदन व अजमेर सौंदाणेचे ( Ajmer Soundane )सरपंच धनंजय पवार यांनी 14 व्या वित्त आयोगाच्या कामात कसूर केल्याने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे ( Divisional Commissioner Radhakrushna Game)यांनी दोघांना अपात्र ठरविले आहे.

ताहाराबाद ग्रुप ग्रामपंचायतीत 14 व्या वित्त आयोगाच्या निधीत खोटी बिले सादर करून कामे न करता निधीचा अपहार उघडकीस आला आहे. यापूर्वी 15 व्या वित्त आयोगाच्या निधीत गैरव्यवहार झाल्याचा ठपका असलेल्या विद्यमान सरपंच शीतल नंदन यांच्यावर गटविकास अधिकार्‍यांनी जायखेडा पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.

आता 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतही अफरातफर झाली आहे. यात काही अधिकारी व आजी-माजी लोकप्रतिनीधींचा समावेश असल्याचे समोर आले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात तक्रारदारांनी सरपंच नंदन यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. नुकत्याच झालेल्या सुनावणीत नंदन या दोषी आढळल्याने त्यांना सध्याच्या कार्यकाळासाठी सरपंच व सदस्य पदावर रहाण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. बाळासाहेबांच्या शिवसेना गटाचे तालुका प्रमुख सुभाष नंदन यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.

तालुक्यातील अजमेर सौंदाणे येथील सरपंच धनंजय पवार यांनीदेखील 14 वित्त आयोगाच्या आराखड्याप्रमाणे कामे केली नसल्याचे कारण देत, त्यांनाही अपात्र ठरविण्यात आले आहे. वृक्ष लागवडासाठी निधीचा तरतुद नसतांना परस्पर दीडड लाखाचा खर्च केल्याने त्यांच्यावर पद सोडण्याची वेळ आली आहे.

गावगाडा साभळताना भाऊबंदकी, रस्त्याचा वाद या भानहगडीतत न पडणे, सुख ः दु:खाच्या समयी भेटणे. आवश्यक असते यात थोडे जरी चुक झाली तरी विरोधक वचपा काढल्या शिवाय राहत नाही. विविध कारणं असतात. आणि ह्याच सर्व कारणाचा वचपा काढण्याची संधी म्हणजे गावचं राजकारण आणि ग्रामपंचायत निवडणूक. याच ग्रामपंचायतीवर निवडून जाणं एकवेळेला सोप्पें असते परतुं पाच वर्षे आपल्या हातून एकही चुक् होणार नाही हे जास्त अवघड असते. या पुढे तर सरपंचांनी धडा घेतला तर ते वाचणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com