सराफ बाजार पुन्हा आठ दिवसांसाठी बंद
नाशिक

सराफ बाजार पुन्हा आठ दिवसांसाठी बंद

करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन सराफ बाजार असोशिएशनचा निर्णय

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

पेशवेकालीन परंपरा असलेला सराफ बाजार रविवारी (दि.५) गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहुर्तावर देखील बंद ठेवण्यात आला. करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पुढील आठ दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय सराफ बाजार असोशिएशनने घेतला आहे.

सराफ बाजाराला २५० वर्षांची परंपरा आहे. रोज साधारणत: ५० कोटींची या ठिकाणी उलाढाल होते. हजारो कारागिर या ठिकाणि काम करतात. मात्र करोना संकटाने इतर क्षेत्राप्रमाणे सराफा बाजाराची झळाळी जोकाळलि आहे. मागील दोन महिन्यांपासून येथील दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. मध्यंतरी मिशन बिगिन अगेन या मोहिमेनंतर दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण शहरात करोनाचा कहर पहायला मिळत आहे.

शहर व जिल्ह्यात रोज दोनशेहून अधिक पाॅझिटिव्ह रुग्ण पहायला मिळत आहे. हा धोका लक्षात घेता पुढिल आठ दिवस पुन्हा सराफा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुपौर्णिमा हा सोने चांदी खरेदीसाठी शुभ मुहुर्त समजला जातो. सोन्या चांदिच्या वस्तू या दिवशि खरेदी करण्यास ग्राहक पसंती देतात. मात्र करोना संकटामुळे या शुभ दिनी देखील सराफा बाजार बंद ठेवावा लागला. या मुळे कोटयवधीची उलाढाल होऊ शकली नाही.

करोनाचे वाढते रुग्ण पाहता पुढिल आठ दिवस सराफ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेतला आहे. करोनामुळे गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहुर्तावर देखील दुकाने बंद ठेवावी लागली.

- चेतन राजापूरकर, अध्यक्ष

सराफ बाजार असोसिएशन

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com