
मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon
पहिल्याच वादळी पावसात (Heavy rain) कळमधरी, ता. नांदगाव (nandgaon) येथील जि.प. शाळेचे (school) पत्रे उडाल्याने शैक्षणिक सत्राच्या प्रारंभालाच विद्यार्थ्यांच्या (students) शिक्षणाचा प्रश्न (education) निर्माण झाला आहे.
शालेय इमारतीच्या दुरावस्थेबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाने दखल न घेतल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यास्तव येत्या दोन दिवसात शाळा इमारतीची दुरूस्ती (Repair of school building) न झाल्यास तीव्र आंदोलन (agitation) छेडण्यात येईल, असा इशारा एकता ग्रुप व प्रहार जनशक्ती पक्षातर्फे (Prahar Janashakti Paksha) देण्यात आला आहे.
याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली नांदगावचे तहसीलदार (tahsildar) व पं.स. गटविकास अधिकार्यांना निवेदन (memorandum) देण्यात आले आहे. उद्या (दि. 15) पासून शैक्षणिक सत्रास प्रारंभ होणार आहे. तत्पुर्वीच पहिल्या वादळी पावसात शाळेचे पत्रे उडाले असून सर्व खोल्यांंसह शालेय आवारात पावसाचे पाणी साचले आहे.
शाळा इमारतीची अत्यंत दैयनीय अवस्था झाल्याने सुमारे वर्षभरापासून दुरूस्तीसाठी पाठपुरावा सुरू होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान (Educational loss of students) होत असल्याने गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकांना वारंवार निवेदने देण्यात आली. तथापि इमारत दुरूस्तीबाबत दुर्लक्ष करण्यात आल्याने सध्या उद्भवलेल्या परिस्थितीस संबंधित अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. वादळी वार्यामुळे शाळेचे पत्रे उडून पावसाचे पाणी वर्गखोल्यांमध्ये साचले आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी वर्गात बसावे तरी कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने येत्या दोन दिवसात शाळा इमारतीची दुरूस्ती करण्यात यावी, अन्यथा सोमवार दि. 20 जुनरोजी सकाळी 11 वाजेपासून बेमुदत अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शेखर पगार, दीपक पगार, सुनिल पगार, बबलू पगार, समाधान पगार, विजय पगार, प्रविण पाटील, चेतन पगार, दर्शन पगार, प्रसाद पगार, आनंदा पगार, सम्राट पगार, प्रशांत पगार, संदीप पगार आदींनी निवेदनाच्या शेवटी दिला आहे.