युवक ग्रामीण विकासाचे शिलेदार : पेरे पाटील

युवक ग्रामीण विकासाचे शिलेदार : पेरे पाटील

पिंपळगाव ब. । प्रतिनिधी Pimpalgaon Basvant

महात्मा गांधीनी (mahatma gandhi) ‘खेड्याकडे चला’ असा संदेश देऊन ग्रामीण भारताचे महत्त्व विशद केले. आधुनिक काळातील (Modern time) युवकांनी (youth) उच्च शिक्षित (Highly educated) होऊन स्वत:चे व देशाचे उज्ज्वल भविष्य घडवावे, त्याचबरोबर ग्रामीण विकासाचे शिलेदार होवून शेती (farming), वनराई आणि संस्कारांचे संगोपन देखील कधीही विसरू नये असे प्रतिपादन आदर्श गाव पाटोदा येथील सरपंच भास्कर पेरे पाटील (Sarpanch Bhaskar Pere Patil) यांनी केले आहे.

येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात (Karmaveer Kakasaheb Wagh College) आयोजित ‘ग्रामविकासात युवकांची भूमिका’ (The role of youth in rural development) या कार्यक्रमाप्रसंगी पेरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेचे सभापति माणिकराव बोरस्ते (Manikrao Boraste, Chairman of MVP) होते. तर व्यासपीठावर स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष विश्वास मोरे, उल्हास मोरे, प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, सारोळेखुर्द सरपंच दत्तात्रय डुकरे, माधव ढोमसे, वसंत कावळे, शरद काळे,

अजय गवळी, विलास हानपोडे, गुलाब मोरे, कुणाल पाटील, भरत दाते, दत्तोपंत आथरे, राजेंद्र निरगुडे, सुनील पाचोरकर, चेतन मोरे आदी उपस्थित होते. पेरे पुढे म्हणाले की, गावाच्या विकासात स्वच्छ पाणी, फळ झाडांची लागवड, शिक्षण, महिलांचा सन्मान, निराधार वृद्धांचा सांभाळ आणि ग्रामस्वच्छतेला विशेष महत्त्व देणे गरजेचे आहे.

युवकांनी शेतकरी असल्याचा अभिमान (Proud to be a farmer) बाळगून सेंद्रिय शेतीचा (Organic farming) अवलंब करावा कारण रासायनिक खतांमुळे (Chemical fertilizer) पुढची पिढी धोक्यात येत असून आयुष्यमान कमी होत आहे. प्रत्येक माणसाने चार झाडे लावावीत. युवकांनी डॉ.अब्दुल कलाम (Dr. Abdul Kalam) यांच्या स्वप्नातला भारत घडविण्यासाठी प्रामणिकपणे प्रयत्न करावे असे प्रतिपादन केले.

यावेळी महाविद्यालयात ‘प्लास्टिक इन प्लास्टिक’ (Plastic in plastic) या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. शिंदे यांनी महाविद्यालयातील उपक्रमाची माहिती दिली. सूत्रसंचालन उपप्राचार्य प्रा.ज्ञानोबा ढगे यांनी केले तर प्रा.अल्ताफ देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com