राष्ट्र उभारणीत शिक्षकांंची भूमिका महत्त्वाची

आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणप्रसंगी मुरकुटे यांचे प्रतिपादन
राष्ट्र उभारणीत शिक्षकांंची भूमिका महत्त्वाची

पाथरे । वार्ताहर Pathare

प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये आई-वडिलांनंतर शिक्षकाला ( Teacher )आदरणीय स्थान प्राप्त झाले आहे. राष्ट्र उभारण्यात देशातील शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी मुधुकर मुरकुटे यांनी केले.

तालुक्यातील आगासखिंड आदिवासी युवा फाउंडेशनकडून नुकतेच आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर समाज कल्याण अधिकारी श्रीधर त्रिभूवणे, सरपंच मीना आरोटे, फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल खोकले, पोलिस उपनिरीक्षक वैशाली मुकणे, नाशिक महापालिकेचे अभियंता गौतम हांडगे, भगूरच्या आरोग्य सभापती संगिता पिंपळे, डॉ.दीपाली टिंबर, नासकाचे माजी संचालक रघूनाथ बरकले, उपसरपंच लहानू बरकले, आर.एन.राजोळे, ग्रामविकास अधिकारी माधव सूर्यवंशी उपस्थित होते.

आज देशांमध्ये अनेक सामाजिक, धार्मिक संकटे फोपावताना दिसत आहेत. त्यातून देशाला सुखरुप बाहेर काढून एक चारित्र्यसंपन्न देश घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. शिक्षकांनी आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक रहावे असे आवाहन मुरकुटे यांनी केले.

यावेळी विनोद विजयगीर गोसावी (कै.पार्वतीबाई महादेवराव तिजारे प्राथमिक विद्यामंदिर, देवपूर ता.जि.धुळे), सुनील किसन भारमल (औताडे पा.विद्यालय, पोहेगाव), सुरेश धोंडू तिटकारे (न्यु. इंग्लिश स्कूल मलठण, ता.शिरुर जि.पूणे), जितेंद्र पांडुरंग निकम (जनता विद्यालय लोहणेर, ता. देवळा), रवि लक्ष्मण बुधर (माध्यमिक शाळा ता.जव्हार), भिमराव मनोहर निरभवणे (आरुढ विद्यालय, म्हाळसाकोरे) यांना सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मंगेश पिंपळे, शरद लहांगे, देवराम खेताडे, जनार्दन खेताडे, पांडुरंग मेंगाळ, विक्रम कवटे, उदय तळपे, सुरेखा हांडगे, रोशन भिसे, माजी सरपंच मधुकर लहांगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com