अमित ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची

अमित ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची

नाशिक । फारूक पठाण Nashik

नाशिकसह Nashik राज्यातील 18 महापालिकांच्या निवडणुका Upcoming Muncipal Corporation Elections नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच होणार आहेत. यामध्ये मुंबई मनपाचादेखील समावेश आहे. मुंबई मनपा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी MNS महत्त्वाची आहे, तर पक्षाचा पहिला महापौर मिळालेली नाशिक मनपादेखील महत्त्वाची असल्याने मुंबईत मनसेनाप्रमुख राज ठाकरे MNS - Raj Thackeray विशेष लक्ष देणार असून नाशिकची जबाबदारी युवा नेते अमित ठाकरे Amit Thackerayयांच्या खांद्यावर राहणार असल्याचे बोलले जात आहे. अमित यांचे गत काही दिवसांत नाशिक दौरेदेखील वाढले असून शहरात नव्याने 122 शाखाप्रमुखांच्या नेमणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची होती. म्हणून यंदाच्या मनपा निवडणुकीची कमांड मनसेनेच्या तरुण नेत्यांकडे राहणार असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत एका विशेष कार्यक्रमात पक्षाचा झेंडा बदलला तर युवा नेते अमित ठाकरे यांचे ‘लाँचिंग’देखील केले. तसे पाहिले गेले तर अमित हे नियमित पक्षाच्या मेळाव्यांना तसेच इतर कार्यक्रमांना हजर राहायचे, मात्र आता त्यांच्याकडे काही विशेष जबाबदार्‍यादेखील देण्यात आल्याने ते अधिक सक्रिय झाल्याचे दिसत आहे. त्यांच्याकडे नाशिक मनपा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आल्याचे समजते. शाखाप्रमुख पक्षाचा कणा असतो, असे राज ठाकरे यांनी सांगितले होते. म्हणून नाशिकमध्ये नव्याने 122 प्रभागांनुसार 122 शाखा तयार करून त्यांच्या नव्याने नेमणुका करण्यात आल्या. यासाठी तब्बल तीन महिन्यांचा काळ लागला. यादरम्यान अमित ठाकरे यांनी विशेष लक्ष दिले. विशेष म्हणजे त्यांनी सुमारे 700 शाखाप्रमुखांसाठी इच्छुकांच्या थेट मुलाखती घेतल्या होत्या. त्यांच्या समवेत ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकरदेखील उपस्थित होते.

युवा नेते अमित ठाकरे हे अत्यंत संयमी नेतृत्व असल्याचे दिसते. तर त्यांच्याकडे खूप ‘नॉलेज’ असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. नाशिकमध्ये येऊन त्यांनी शाखाप्रमुखांसाठीच्या मुलाखती घेतल्या त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी थेट चर्चा करून आपण कोणत्या प्रभागात इच्छुक आहे, सध्या कोणत्या पक्षाचा सदस्य निवडून आलेला आहे, आरक्षणाबद्दल काय परिस्थिती आहे व आपले व्हिजन काय, अशा प्रकारचे प्रश्न विचारले होते. यामुळे त्यांच्या कामाची शैली कार्यकर्त्यांच्या लक्षात आली आहे.

मिशन मनपा

मागील सुमारे एक वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिक महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. या काळात पक्षप्रमुखांसह विविध नेत्यांचे दौरेदेखील झाले. राज ठाकरे यांनी एक मेळावा घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. तर सतत प्रभाग संख्येवरून शासनाला चांगलेच धारेवर धरले होते. नाशिक मनपात पुन्हा सत्ता घेण्यासाठी मनसेना पूर्ण शक्तीने कामाला लागली आहे.

ग्रामीण भागात मोर्चा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिकमध्ये तीन आमदार होते व मनपाची सत्ताही होती. त्यावेळी पक्षाचे संघटन खूप मजबूत होते. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिन्ही आमदार पराभूत झाले तर 2017 साली मनपाची सत्तादेखील गेली. यावेळी पक्षाचे फक्त पाच नगरसेवक निवडून आलेले आहेत. यामुळे पक्षाचे संघटन कमकुवत झाले होते. त्याला पुन्हा उभारी देऊन संघटन उभे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आता प्रयत्न सुरू झाले आहेत. युवा नेतृत्व असलेल्या अंकुश पवार यांना दोन वर्षांपूर्वी नाशिक शहराध्यक्षपदाची जबादारी देण्यात आली होती. त्यांनी पक्षासाठी अहोरात्र परिश्रम घेऊन शहरात चांगले संघटन तयार केले.

त्यांच्या काळात विविध आंदोलने झाली. करोनाकाळातदेखील खूप काम झाले. तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात पक्षाशी जुळला. यामुळे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्यावर आता नाशिक जिल्ह्याची जबाबदारी देऊन जिल्हाप्रमुख केले, तर जिल्हाप्रमुख असलेले व मनपाच्या कामकाजाचा अभ्यास असलेल्या दिलीप दातीर यांना नाशिक शहराची जबाबदारी दिली. यामुळे शहरासह ग्रामीण भागातदेखील पक्षसंघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.