बागलाणचे रस्ते कात टाकणार

बागलाणचे रस्ते कात टाकणार

मुंजवाड । वार्ताहर Munjwad

बागलाण तालुक्यातील Baglan Taluka रस्ते, पुलांच्या Roads, Bridge कामाबरोबरच मुल्हेर ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसाठी यंदा हिवाळी अधिवेशनात Winter Session सादर केलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात 35 कोटी 25 लाख रुपयांच्या विकास कामांना मंजुरी Approval of development works देण्यात आल्याची माहिती आ. दिलीप बोरसे MLA Dilip Borseयांनी दिली.

बागलाण तालुक्यातील बहुतांश ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्या रस्त्यांच्या सुधारणा कामांसाठी ही कामे प्रस्तावित केली होती. या कामांना यंदाच्या हिवाळी अधिवेशनात सादर केलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात त्यांना मान्यता दिल्याचे आ. दिलीप बोरसे यांनी स्पष्ट केले. पुरवणी अर्थसंकल्पात कोळीपाडा ते कोटबेल रस्त्यावर पूल बांधणे व रस्ता सुधारणा करणे 2 कोटी 50 लक्ष, दगडी साकोडे ते मोठे साकोडे रस्ता बांधकाम करणे 40 लक्ष,

मानूर ते गुजरात हद्द रस्त्यावर देऊळपाडा येथे पूल बांधणे 50 लक्ष, तळवाडे ते पठावे रस्त्यावर पूल बांधणे 50 लक्ष, करंजखेड भावनगर रस्त्यावर पूल बांधणे 50 लक्ष, मोहळागी-हतनूर-हरणबारी रस्ता बांधकाम करणे 30 लक्ष, माळीवाडे देवठाणपाडे रस्ता बांधकाम करणे 20 लक्ष, पठावे-चिंचपाडा-पिसोरे रस्ता बांधकाम करणे 50 लक्ष, प्रजिमा 55 ते मुंगसे-वीरगावपाडा रस्ता बांधकाम करणे 25 लक्ष,

निकवेल ते जोरण रस्ता बांधकाम करणे 25 लक्ष, चौंधाणे-कपालेश्वर रस्ता बांधकाम करणे 25 लक्ष, जोरण ते दहिंदुले रस्त्याचे बांधकाम करणे 25 लक्ष, पठावे-सावरपाडा रस्त्यावर हत्ती नदीवर पुलाचे बाधकाम करणे 63 लक्ष, तळवाडे-भवाडे रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे 70 लक्ष, जाड-गौतमनगर-डवरबारी रस्त्यावर पूल बांधणे 50 लक्ष ही कामे समाविष्ट करण्यात आली आहेत.

प्रलंबित रस्त्याला मंजुरी

शहरातील ताहाराबाद रोड ते मुंजवाड या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. ताहाराबाद रोड ते सुकडनाला मळगाव मुंजवाड तसेच चित्रा सिनेमा ते मळगाव रोड हा रस्ता प्रस्तावित करण्यात आल्याचे आ. बोरसे यांनी स्पष्ट करत या पाच कोटी रुपये खर्चाच्या कामाला पुरवणी अर्थसंकल्पात मान्यता देण्यात आली असून लवकरच या नव्याने होणार्‍या रस्त्याच्या कामाला लवकरच तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात येईल. त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी आ. चव्हाण दाम्पत्याने पाच वर्ष झोपा काढल्या आता आमदार की गेल्या नंतर त्यांना विकासाचा पुळका आला आहे. मुल्हेर ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून 22 कोटी रुपयांच्या कामाला यापूर्वी तत्वतः मान्यता मिळून त्याचा नुकताच पुरवणी अर्थसंकल्पत समाविष्ट झाला आहे. मात्र कृतिशून्य चव्हाण दाम्पत्ये आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम करत असल्याची टिका बागलाणचे आ. दिलीप बोरसे यांनी केली.

बागलाणच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातील गरीब आदिवासींना वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून आपण वेळोवेळी पाठपुरा केला. त्यानुसार गेल्या 8 ऑक्टोबर रोजीच्या शासन निर्णय नुसार सचिव समितीच्या बैठकीत मुल्हेर येथील ग्रामीण रुग्णालय इमारत व अधिकारी, कर्मचारी निवासस्थान इमारत बांधकामास तत्वतः मान्यता देण्यात आल्याचे आ. दिलीप बोरसे यांनी स्पष्ट केले.

आता सदर काम विधिमंडळाच्या चालू हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी अर्थसंकल्पत समाविष्ट झाले आहे. त्यामुळे कामास लवकर सुरवात होणार आहे. आ. बोरसे यांनी स्पष्ट करत आ. बोरसे म्हणाले की आपण प्रामाणिकपणे काम करत असतांना ज्यांना पाच वर्षात कोणतेही विकास काम करता आले नाही ते चव्हाण दाम्पत्ये फुकटचे श्रेय लाटतांना जनता पाहत आहे. वास्तविक आपण प्रामाणिपणे काम करत असतांना चव्हाण दाम्पत्य विकास कामांना ब्रेक लावत आहे. अशा नाठ्याळ मंडळीचा जनतेसमोर लवकरच बुरखा फाटेल असा इशाराही आ. बोरसे यांनी दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com