रस्ता रूंदीकरणाचा वाद पेटला

मनमानी काम केल्यास बंद पाडण्याचा नागरिकांचा इशारा
रस्ता रूंदीकरणाचा वाद पेटला

सटाणा । प्रतिनिधी | Satana

येथील सटाणा (satana)-भाक्षी रस्त्याचे रुंदीकरणाचे (Road widening) काम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे (Public Works Department) मनमानी पध्दतीने केले जात असल्याचा आरोप करीत परिसरातील नागरीकांनी या कामास तीव्र विरोध दर्शविला आहे.

शून्य किलोमीटरपासून रस्त्याचे काम (road work) सुरू करावे, पूर्वी शासनाने मंजूर केलेल्या रस्त्याच्या एकूण 18 मिटर रुंदीच्या आतच गटार, फुटपाथ व इतर कामे करावीत, कोणतीही पूर्व सूचना न देता अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली चाललेली हुकूमशाही बंद करावी अन्यथा रस्त्याचे पुढील काम बंद पाडले जाईल, असा इशारा देखील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या संतप्त मालमत्ताधारक, प्लॉटधारक व शेतजमीन मालकांनी दिला आहे. त्यामुळे या रस्त्याचे रूंदीकरणाचे काम वादाचा विषय बनले आहे.

सटाणा-भाक्षी मार्गावरील संतप्त नागरीकांनी बांधकाम विभागाचे उपअभियंता जयंत पवार (Jayant Pawar, Deputy Engineer, Construction Department) यांची भेट घेऊन निवेदन (memorandum) देत रूंदीकरणाच्या नावाखाली होत असलेल्या मनमानीमुळे नागरीक तसेच व्यावसायिकांच्या होत असलेल्या हालअपेष्टांकडे लक्ष वेधण्यात आले. भाक्षी रस्त्याच्या दुतर्फा बहुतांश नागरिकांची घरे, छोटी मोठी दुकाने, टपर्‍या,व्यापारी प्रतिष्ठाने आहेत.

रस्ता रुंदीकरणाच्या (Road widening) प्रयत्नात सर्वच छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या व्यवसायावर गदा येऊन उपासमारीची वेळ येणार असल्याने तीव्र नाराजी पसरली आहे. शासकीय नियमानुसार 18 मीटर रुंदीचा रस्ता आजही तयार आहे मात्र हा रस्ता सुरुवातीस शून्य किलोमीटरवर 14 फूट, काही ठिकाणी 18 तर पुढे 22 फूट रुंदीचा असल्याचे भासविले जात आहे.

तसेच ठिकठिकाणी अतिक्रमणाच्या खुणा पाहून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शून्य किलोमीटर ला या रस्त्याची एकूण रुंदी 14 मीटर आहे तर मग पुढे 18 मीटरचे रुंदीकरण करून शासनाचा पैसा नाहक वाया घालविण्याची गरज काय? असाही प्रश्न संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.

नागरी वस्तीतील महागडे प्लॉट व सोन्याच्या किमतीच्या शेतजमिनी रस्ता रुंदीकरणासाठी वापरु नये, शून्य किलोमिटर पासून काम सुरू करावे, 18 मिटरच्या आत रस्त्याची अनुषंगिक सर्व कामे पूर्ण करण्याची हमी सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी नागरीकांनी दिला.

यावेळी भाजयुमो तालुकाध्यक्ष मंगेश खैरनार, प्रा.बी. के.पाटील, धर्मा मंजुळे, दिलीप पवार, राजेंद्र गवळी, जगदीश खैरनार, तुषार मंजुळे, सुरेखा शेवाळे, प्रकाश जगताप, सुनील खैरनार, दिलीप पगार, राधे शाम पवार, यशवंत पवार, चंद्रशेखर बागड, अशोक निकुंभ, राकेश घोडे, विजय पवार, अशोकनिकम, अमोल मंजुळे, खंडू खैरनार आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com