लोकसहभागातून रस्ता केला रुंद

लोकसहभागातून रस्ता केला रुंद

जानोरी शेतकर्‍यांचा आदर्श उपक्रम

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) जानोरी (janori) येथील जुन्या आडगाव (Adgaon) रस्त्यालगत रस्ता शेतकर्‍यांच्या समन्वयातुन लोकवर्गणीतून रस्ता तयार करून एक आदर्श काम करून एक आदर्श निर्माण केला असून गावातील इतर शेतकर्‍यांनीही (farmer) याचा आदर्श घ्यावा असे आवाहन तलाठी (talathi) किरण भोये यांनी केले आहे.

सध्या महाराष्ट्र शासनाचा (maharashtra government) महाराजस्व अभियानाअंतर्गत (Maharajaswa Abhiyana) गावातील शिवार रस्ते (road), पानंद रस्ते, खाजगी वस्तीवरील रस्ते, अतिक्रमित असणारे रस्ते लोकसहभाग व संगनमतातून रस्ते मोकळे करण्याची मोहीम राज्यभरात महसूल व ग्रामस्थांच्या सहकार्यातून ही मोहीम राज्यभरात राबविली जात आहे. त्याचाच आदर्श घेऊन दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावातील शेतकर्‍यांनी लोकवर्गणीतून अरूंद असलेल्या शेत रस्त्याचे रुंदीकरण (Road widening) करून एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे.

जानोरी ते जुना आडगाव रस्त्यालगतच्या नितीन विधाते यांच्या शेताकडे जाणार्‍या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था होती. रस्ता अरुंद असल्याने शेतमालाची, शेती अवजारे, खते व बी बियाणे यांची ने आण करण्यासाठी मोठी कुचंबणा होत होती. होणारी अडचण लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व शेतकरी (farmer) एकत्र येत होणार्‍या अडचणीवर मात करण्यासाठी एकत्र येण्याचे ठरविले.

त्यानुसार प्रत्येकाने दोन्ही बाजूच्या शेतकर्‍यांनी आवश्यक ते सहकार्य करून रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा एकमताने निर्णय घेतला. त्यासाठी लागणारा खर्च हा संबंधित क्षेत्रातील शेतकर्‍यांच्या लोकवर्गणीतून करण्याचे ठरविले. त्यानुसार या मार्गावरील सर्व शेतकर्‍यांनी अर्थसहाय्य (Financial aid) करून रस्त्याचे रुंदीकरण करून घेतले. यामुळे शेतकर्‍यांची अडचण दूर होणार असल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले.

यासाठी विशेष प्रयत्न शरद विधाते, कैलास वाघ, नितीन विधाते, सोमनाथ वाघ, दिपक वाघ, पंडित वाघ, प्रकाश वाघ, आत्माराम क्षिरसागर, शिवाजी वाघ, वसंत वाघ, सुरेश वाघ, तुकाराम वाघ, राजू वाघ, सुनील वाघ, नंदू वाघ, रघुनाथ वाघ, विकी वाघ, चक्रपाणी वाघ, अतुल वाघ, या शेतकर्‍यांनी मिळून हे आदर्श काम घडवून आणले. यावेळी तलाठी किरण भोये व तंटामुक्ती अध्यक्ष रेवचंद वाघ यांनी या सर्व शेतकर्‍यांचे कौतुक केले.

शासनाची कोणतीही मोहीम असो जानोरी गावात ती मोहीम यशस्वीपणे राबविले जाते. ते पंचक्रोशीत आदर्श ठरते. आज लोकसहभागातून जानोरी येथील शेतकर्‍यांनी एक आदर्श काम केले आहे. तो आदर्श इतर शेतकर्‍यांनीदेखील घ्यावा व समन्वयातून रस्त्यामुळे होणारी आपली अडचण दूर करून घ्यावी. त्यासाठी आवश्यक सहकार्य व मार्गदर्शन प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल.

किरण भोये, तलाठी जानोरी

हा रस्ता अरुंद असल्याने खुप अडचण तयार होत होती. अनेकवेळा वादाचे देखील प्रसंग उद्भवले परंतु होणारी अडचण व नुकसान यांचा विचार करून आम्ही सर्व शेतकर्‍यांनी समन्वयातून मार्ग काढत लाभाधारक शेतकर्‍यांकडून वर्गणी काढून रस्ता रूंद करून घेतला. नक्कीच याचं समाधान वाटतं. या मार्गावरील सर्व शेतकरी एकत्र येऊन एक समाजापुढे आदर्श निर्माण केला ते नक्कीच अभिमानास्पद आहे.

शरद विधाते, स्थानिक शेतकरी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com