काम पूर्णत्वाकडे जाण्या अगोदरच निकृष्ट दर्जाचे पितळ उघडे

काम पूर्णत्वाकडे जाण्या अगोदरच निकृष्ट दर्जाचे पितळ उघडे

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

सुमारे सहा महिन्यांपूर्वी चकाचक बनलेला व दोन महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी सुरू केलेला सातपूर कॉलनी (Satpur Colony) येथील काँक्रीटचा रस्ता (Concrete road) अक्षरशा उखडू लागल्याने मनपाच्या निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडले आहे.

विशेष म्हणजे या रस्त्याचे काम (road work) अद्याप पूर्ण झाले नसून अश्याप्रकारे रस्ता उखडू लागल्याने माजी नगरसेवकांसह नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. प्रभाग क्र. ११ मधील मनसेचे माजी नगरसेवक सलीम शेख, योगेश शेवरे व प्रभाग १० च्या भाजपाच्या माजी नगरसेविका पल्लवी पाटील यांनी एकत्र येत

या रस्ता काँक्रिटीकरणच्या (concretization) कामासाठी प्रत्येकी सव्वा कोटी याप्रमाणे पावणे चार कोटी रुपयाचा नगरसेवक निधी (fund) देत या रस्ता काँक्रिटीकरण कामाचे श्रीफळ फेब्रुवारी महिन्यात वाढवले होते.

दरम्यान, ठेकेदाराकडून रस्ता खोद काम करत प्रत्यक्षात काँक्रीट करण्याच्या कामाला उशिरा प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे नागरिकांसह व्यापारी वर्गात प्रचंड नाराजी व्यक्त होत होती. माजी नगरसेवक सलीम शेख (Former Corporator Salim Shaikh) यांनी पाठपुरावा करत कामात गती आणली. अखेर सहा महिन्यापूर्वी अर्ध्या रस्त्याचे काम पूर्ण करत दोन महिन्यांपूर्वी रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

तर पुढील अर्ध्या रस्त्याचे काम (road work) संथ गतीने सुरु आहे. दरम्यान, वाहतुकीस सुरु केलेल्या रस्त्यांची दुरावस्था झाली असून ठीकठिकाणी रस्ता उघडला गेला असून खड्डे पडले आहे. अधिकारी व ठेकेदाराच्या संगणमताने केवळ आर्थिक देवाणघेणीतून रस्त्याची वाट लावली असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

सर्वसामान्य जनता रक्ताचे पाणी करून मनपाचे टॅक्स भरते. मात्र अश्या प्रकारे निकृष्ट दर्जाचे काम करत एक प्रकारे आमच्या पैशाची उधळण केली जाते. या जबाबदार कोण

बिल अदा केल्यास जनआंदोलन ठेकेदाराकडून चांगले काम करुन घेण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. मात्र अधिकारी आणि ठेकेदाराच्या संगणमताने मोठा भ्रष्टाचार फोफावात असल्याचे दिसून येत आहे. प्रत्यक्षात १२ मिटर असलेल्या रस्त्याचे केवळ ८ मिटर रस्त्याच काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे यानिकृष्ट दर्जाच्या कामाचे बिल अदा झाल्यास जनआंदोलन करणार.

- सलीम शेख, मा. नगरसेवक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com