विमा क्षेत्रात टपाल विभागाची भरारी

उत्पन्न वाढवण्यासाठी डाकसेवकांची धडपड
विमा क्षेत्रात टपाल विभागाची भरारी

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांच्या विश्वासाला पात्र असलेल्या डाक विभागाने Postal Department उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी टपाल जीवन विमा क्षेत्रात insurance sector भरारी घेत विविध उपक्रम राबविण्यास प्रारंभ केला असल्याची माहिती प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी दिली.

ग्रामीण भागातील नागरिकांच्या उत्पन्नाच्या मानाने त्यांना परवडेल असा स्वस्तात ग्रामीण टपाल जीवन विमा काढून देण्याची मोहीम भारतीय डाक विभागाच्या नाशिक विभागाने सुरु केली आहे. यानिमित्ताने 22 सप्टेंबर रोजी ‘महालॉगीन डे’ साजरा करण्यात आल्याची माहिती पश्चिम उपविभागाचे सहाय्यक अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

या दिवशी पश्चिम उपविभागाने एकाच दिवशी तब्बल 116 प्रस्ताव बनवून सुमारे अडीच लाख रुपयांचा प्रमियम जमा केला. यात विजय तांबे (गोंदे), मदन परदेशी (भोजापूर) व अमोल शिंदे (सायखेडा) यांनी उल्लेखनीय काम करीत अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.

टपाल विभागाने बँकिंग क्षेत्रासह आता विमा क्षेत्रातही पाऊल ठेवल्याने उत्पन्नाच स्त्रोत निर्माण झालेले आहेत. त्याचबरोबर खासगी टपालसेवेलाही टपाल विभाग ताकदीने स्पर्धा निर्माण करीत आहे. कर्मचार्‍यांना कौशल्य प्रशिक्षण देवून टपाल खात्याने कात टाकली आहे.

ग्रामीण भागात डाक विभागाचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी ग्रामीण डाक सेवकांकडून विशेष मेहनत घेतली जात आहे. आधार कार्डला मोबाईल लिंक करण्याची सुविधा खेड्यापाड्यात पोस्टाद्वारे सुरु झाली आहे. यासारख्या पोस्टाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.

नागरिकांचा प्रतिसाद

समृध्दी सुकन्या योजना, इंडिया पोस्ट पेमेंट बॅँक, भारतीय ग्रामीण डाक विमा योजना, मोबाईल आधार अपडेट, स्पीड पोस्ट, इतर बॅँकांचे पैसे घरबसल्या काढून देणे (एईपीएस), लाईट बिल, फोन बिल भरणा, विविध कर भरणे, एनईएफटी, आर. टी. जी. एस. अशा विविध योजना सुरु करुन डाक विभागाने आपली छाप कायम ठेवली आहे.

Related Stories

No stories found.