'सुंदर माझे कार्यालय' अभियानातून सुयोग्य वातावरण - जिल्हाधिकारी मांढरे

'सुंदर माझे कार्यालय' अभियानातून सुयोग्य वातावरण - जिल्हाधिकारी मांढरे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नागरिक,अधिकारी व कर्मचारी यांना शासकीय कार्यालयात government office स्वच्छतेसोबत सुंदर, सुयोग्य वातावरण मिळावे या हेतूने शासनाने सुंदर माझे कार्यालय अभियान 'swaccha maajhe karyalay' abhiyan सुरू केले आहे., या अभियांनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसिल व सर्व उपविभागीय कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहिमेसोबतच प्रशासकीय कामकाजाला गती देवून सुयोग्य कार्यसंस्कृतीचे वातावरण सर्वांसाठी निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुरज मांढरे Collector Suraj Mandhare यांनी केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज जिल्हाधिकारी कार्यालयात सुंदर माझे कार्यालय या अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी मांढरे यांच्या हस्ते झाला.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी रोहयो, नितीन मुंडावरे, उपजिल्हाधिकारी प्रशासन भीमराज दराडे, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसीकर, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन नितीन गावंडे, उपजिल्हाधिकारी निलेश श्रीगी, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ,उपजिल्हाधिकारी वासंती माळी, तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, राजश्री अहिरराव, दीपक पाटील, राजेंद्र नजन, रचना पवार, यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मांढरे यांनी सांगितले की, अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमधील परिसर स्वच्छ असावा तसेच येणार्‍या नागरिकांना आणि कार्यालयातील कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना पण योग्य वातावरण कार्यालयात मिळावे याकरिता प्रयत्न केले जाणार आहेत.

अभियानाच्या निमित्ताने अधिकारी कर्मचारी यांचे सेवाविषयक प्रश्न तसे बढती वेतन, बदली, गोपनीय अहवाल, सेवा पुस्तक, भविष्य निर्वाह निधी यासाठीही या वेळामध्ये मोहीम स्वरूपात काम होणार असल्याने कर्मचार्‍यांनाही याचा फायदा होणार आहे. तसेच या वेळच्या निमित्ताने महसूल विभागामार्फत दिल्या जाणार्‍या शासनाच्या वेगवेगळ्या सेवा सर्वसामान्य नागरिकांना सुलभतेने मिळण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे.

यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांमधील अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहून कार्यालयीन स्वच्छतेचे अभियान राबविले. यामध्ये कार्यालयांमधील सर्व विभागांमध्ये साफसफाई करण्यात आली जुने मोडके फर्निचर निकामी कागदपत्रे इत्यादींची यानिमित्ताने साफसफाई करण्यात आली

Related Stories

No stories found.