यूपीएससी
यूपीएससी
नाशिक

रिक्षाचालकाचा मुलगा झाला सनदी अधिकारी

‘यूपीएससीत’ चमकले नाशिकचे विद्यार्थी

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक | Nashik

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि. ४) जाहीर झाला आहे. या परीक्षेत रिक्षा चालक जगन्नाथ पवार यांचा मुलगा स्वप्निल पवार याने पहिल्याच प्रयत्नात युपीएससीत यश मिळवले.

तर, पिंपळगाव बसंवत येथील सुमीत जगताप याने ५०७ वी रँक मिळवत उज्वल यश संपादन केले आहे. तसेच अंकिता वाकेकर या विद्यार्थीनीने ५४७ वी रँक मिळवत यश संपादन केले आहे. नाशिकमधील अंकिता अरविंद वाकेकर हिने मागासवर्गीय प्रवर्गात महाराष्ट्रातून पहिला क्रमांक पटकावला असून अंकिताची आई (संघमित्रा बाविस्कर) या दिंडोरी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार आहेत. तर वडील (अरविंद वाकेकर) हे ‘महाजेनको’मध्ये उपकार्यकारी अभियंता आहेत.

स्वप्नील जगन्नाथ पवार याने युपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात ६३५ वी रँक मिळवत यश संपादन केले. त्याचे वडील (जगन्नाथ पवार) हे गेल्या ३० वर्षांपासून रिक्षा चालवतात. इंडियन फॉरेन सर्व्हिसेस (आयएफएस) हे मुख्य उद्दिष्ट ठेवून त्यांनी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. आयएफएस होण्यासाठी वेळ पडली तर अजूनही युपीएससी परीक्षा देवू, असेही स्वप्निलने सांगितले.

पिंपळगाव बसंवत (ता. निफाड) येथील सुमीत जगताप याने ५०७ वी रँक मिळवत उज्वल यश संपादन केले. केमिकल इंजिनिअरींग ही पदवी संपादित करुन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास त्याने सुरु केला. सुमीतचे वडील कैलास जगताप हे चांदवड पोलीस ठाण्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत.

सिव्हिल सर्विसेस परीक्षेच्या मुलाखती २० जुलैला सुरु झाल्या. या परिक्षांचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. करोनामुळे ही मुलाखत प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. आयएएससाठी १८०, आयएफएससाठी २४, आयपीएससाठी १५०, केंद्रीय सेवा ग्रुप ए साठी ४३८,

ग्रुप बीसाठी १३५ जणांची निवड करण्यात आली आहे. एकूण ८२९ उमेदवारांची निवड झाली आहे. सामान्य गटातून ३०४, ईडब्ल्यूएसमधून ७८, ओबीसीमधून २५१, एससी १२९ आणि एसटी वर्गातून ६७ उमेदवारांनी यश संपादन केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com