वाह! नाशिकच्या रिक्षावाल्याचा असाही प्रामाणिकपणा

वाह! नाशिकच्या रिक्षावाल्याचा असाही प्रामाणिकपणा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

रिक्षामध्ये आयफोन-१२ (Iphone 12) मोबाईल विसरून गेलेल्या प्रवाशाला मोबाईल परत करत नामदेव चव्हाण (Namdeo Chavhan) या रिक्षाचालकाणे समाजात अजूनही प्रामाणिकपणा कायम आहे हे आपल्या कृतीतून दाखवून देत इतरांसमोर आदर्श ठेवला आहे. त्यांचा या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला....

ललित रुंगटा ग्रुपचे अभिषेक बुवा (Abhishek Buwa) यांचे लहान बंधु ऋषिकेश बुवा (Rishikesh Buwa) यांचा मोबाईल आयफोन -१२ नाशिकरोड ते कॅालेजरोड दरम्यान प्रवासांत रिक्षामध्ये पडला. बुवा हे घरी पोहोचल्यावर त्यांना याबाबत लक्षात आले. त्यांनी याबाबत त्यांचे मोठे बंधू अभिषेक यांना सांगितले. अभिषेक यांनी लगेचच शरद बोडके यांना फोनवर सर्व माहिती दिली.

वाह! नाशिकच्या रिक्षावाल्याचा असाही प्रामाणिकपणा
करन्सी नोट प्रेस परिसरात भीषण आग; आगीचे लोळ थेट मुख्य रस्त्यापर्यंत

नाशिक शहरातील तब्बल दोन हजार नोंदणीकृत रिक्षाव्दारा जाहिरात करण्याचे काम बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

बोडके यांनी तात्काळ व्हाट्सॲप ग्रुपद्वारे दोन हजार रिक्षाचालक बांधवांना मोबाईल हरवल्याचा निरोप व्हाईस एसएमएसद्वारे दिला. एक तासाने लगेचच रिक्षा चालकाच्या मदतीने नामदेव चव्हाण यांनी अभिषेक बुवा यांना फोन केला व मोबाईल सापडल्याचे कळविले .

गंजमाळ येथे चव्हाण हे मोबाईल घेऊन आले व शरद बोडके यांच्या हस्ते त्यांना प्रामाणिकपणा दाखविल्याबद्दल तब्बल पाच घरगुती वापरातील वस्तू गिफ्ट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

वाह! नाशिकच्या रिक्षावाल्याचा असाही प्रामाणिकपणा
पोलीस आयुक्त अडले, पंपवाले नडले; पेट्रोल पंप राहणार बंद

आजही चव्हाण यांच्यासारखे प्रामाणिक माणसे समाजात वावरत असतात, त्यांच्यामुळे माणुसकी जिवंत आहे त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक वाटते, असे बोडके यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com