'या' पदविका परीक्षांचा निकाल जाहीर

निकाल
निकालresults

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सहकार विभागामार्फत (Department of Cooperation) मे २०२२ मध्ये शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा (Government Cooperation and Accountancy Diploma Examination) आणि सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन प्रमाणपत्र परीक्षा (Co-operative Housing Society Management Certificate Examination) घेण्यात आल्या होत्या.

त्या परिक्षांचा निकाल (Exam Result) घोषित करण्यात आला आहे, असे सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ. सतिष खरे (Co-operative Societies District Deputy Registrar Dr. Satish Khare) यांनी कळविले आहे. परीक्षार्थ्यांना वरील परीक्षांचे निकाल जीडीसीए महाराष्ट्र जीएव्ही.ईन (GDS Maharashtra Gov.in) या संकेतस्थळावर महत्वाचे दुवे मधील जी.डी.सी न्ड ए मंडळ येथे लॉगइन पासवर्ड वापरून उपलब्ध होणार आहेत. फेरगुण मोजणी करण्यासाठी परीक्षार्थ्यांना (students) ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत याच संकेतस्थळावर अर्ज सादर करता येतील.

फेर गुण मोजणी करण्यासाठी परीक्षार्थी (students) यांनी फेरगुणमोजणी शुल्क भारतीय स्टेट बँकेच्या (State Bank of India) कोणत्याही शाखेत प्रत्येक विषयासाठी रूपये ७५/- अधिक बँक चार्जेस याप्रमाणे ३१ डिसेंबर २०२२ (रात्री १०.३० वा.) पर्यंत चलनाने भरणे आवश्यक आहे. भरणा करण्यात आलेले चलन बँकेत ०३ जानेवारी २०२३ पर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेत सादर करण्यात यावे. दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त होणार्‍या अर्जांचा विचार करण्यात येणार नसल्याचेही डॉ. सतिष खरे यांनी कळविले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com