दहावी पुनर्परीक्षार्थींचा निकाल पूर्वीच्या गुणांकांवर

शिक्षण मंडळाकडून निकष जाहीर
दहावी पुनर्परीक्षार्थींचा निकाल पूर्वीच्या गुणांकांवर

नाशिक । प्रतिनिधी

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मुल्यांकन पद्धत आणि अकरावी प्रवेशाचे निकष महाराष्ट्र बोर्डाने जाहीर केले. यासोबतच 17 नंबरचा फॉर्म भरुन दहावीला बसलेले किंवा खासगी विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापन पद्धत कशी असणार याचे निकष देखील जाहीर करण्यात आले आहेत.

दहावीच्या पुनर्परीक्षार्थी तसेच खासगी विद्यार्थ्यांचे मुल्यमापन कसे केले जाणार असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र आता पुनर्परीक्षार्थींना राज्य मंडळाच्या यापूर्वीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विषयांमधील लेखी परीक्षेत मिळालेले गुण ग्राह्य धरले जातील. या गुणांच्या सरासरीस 80 गुण असतील. तसेच 10 वीच्या अंतिम तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षेस अंतर्गत मुल्यमापनाद्वारे 20 गुण असतील, असे एकूण 100 गुण मोजले जातील.

राज्य मंडळाच्या यापुर्वीच्या परीक्षेत एक किंवा अधिक परीक्षांमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना त्याआधीच्या परीक्षांत उत्तीर्ण झालेल्या गुणांच्या सरासरीने गुण दिले जातील. यापूर्वीच्या लेखी परीक्षेतील 80 पैकी प्राप्त गुणांच्या सरासरीएवढे गुण लेखी परीक्षेसाठी संगणक प्रणालीमार्फत दिले जाणार आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे वर्ष आणि बैठक क्रमांक संगणक प्रणालीत अचूक नोंदवावे असे आवाहन माध्यमिक शाळांना करण्यात आले आहे. ज्या वर्षांमध्ये 100 गुणांची परीक्षा झाली असेल तिथे त्या गुणांचे 80 गुणांत रुपांतर करुन सरासरी एवढे गुण लेखी परीक्षेसाठी दिले जातील.

खासगी विद्यार्थ्यांना संपर्क केंद्राने आयोजित केलेल्या सराव चाचण्या, पूर्ण केलेल्या स्वाध्याय चाचण्या, गृहकार्य, प्रकल्प यापैकी एक किंवा अधिक बाबींसाठी मिळालेल्या गुणांचे 80 पैकी गुणांमध्ये रुपांतर होणार आहे. विद्यार्थ्यांना दहावीच्या अंतिम तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षेतील मुल्यमापनानुसार 20 गुणांमध्ये रुपांतर होणार आहे.

परीक्षेत उत्तीर्ण नसल्यास?

एकाही परीक्षेत उत्तीर्ण नसलेल्या विद्यार्थ्यांची सराव चाचण्या, स्वाध्याय, गृहकार्य, प्रकल्प यापैकी एक किंवा अधिक बाबींची पूर्तता पाहून 80 पैकी गुण दिले जाणार आहेत. अशाप्रकारे माध्यमिक शाळांद्वारे मुल्यमापन केले जाईल. 9 वीमध्ये प्राप्त झालेल्या एकूण गुणांची टक्केवारी यावेळी मोजली जाईल.

Related Stories

No stories found.