मविआच्या निष्क्रीयतेमुळेच ओबीसी समाजाचे आरक्षण गेले – आ.गिरीष महाजन

ओबीस जागर अभियान बैठक संपन्न.
मविआच्या निष्क्रीयतेमुळेच ओबीसी समाजाचे आरक्षण गेले – आ.गिरीष महाजन

नाशिक | प्रतिनिधी

महाविकास आघाडीने Mahavikas Aaghadi ओबीसी समाजाला वाऱ्यावर सोडले, महाविकास आघाडीच्या निक्रीयतेमुळेच ओबीसी समाजाचे आरक्षण OBC Reservationगेले असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी मंत्री आ.गिरीष महाजन MLA Girish Mahajan यांनी केले. ते ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आयोजित ओबीसी जागरण मेळाव्यात OBC'S Jagar Abhiyan बोलत होते.

आ. महाजन आपल्या भाषणात म्हणाले की, महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षामध्ये आपआपसात समन्वय नसुन एक पक्ष निर्णय घेतो तर दुसरा पक्ष त्याला विरोध करतो. ओबीसींना आरक्षण मिळावे ही सरकारची मानसिकताच नसल्याचे ते म्हणाले. हे सरकार सर्वस्तरावर अपयशी ठरले असून अतिवृष्टी मुळे शेतकरी उधवस्त झाले, शेतकरी आत्महत्या करता आहेत परंतू महाविकास आघाडी सरकार तर्फे अदयापोवोतो शेतकऱ्यांना एक रुपयाची मदत मिळाली नाही.

ना.डॉ.भारती पवार म्हणाल्या की, केंद्र शासनाच्या ओबीसी साठींच्या योजना राबविण्यासाठी आपण काम करू तसेच ओबीसींच्या समस्या व प्रश्न योग्यत्या मंत्रालयाकडे पोहोचून त्या साडविण्यासाठी आपण काम करू.

ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर म्हणाले की, ओबीसीच्या न्याय हक्कासाठी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा कटीबध्द असून ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही झोकून घेवू व ओबीसी समाजाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असे सांगून ते पुढे म्हणाले की महाविकास आघाडी सकरार ओबीसी समाजाला आरक्षण देणार नसेल तर ना.छगन भुजबळ यांनी आपला राजीनामा दयावा.

प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडी आरक्षण टिकविण्यात अपयशी ठरलेच पण कुठल्याही विषयावर केंद्र सरकारच्या नावाने बोट दाखवून नामा निराळे होतात. त्यामळेच समस्या मार्गी न लागता राज्याच्या नागरीकांच्या समस्या वाढतच चालल्या आहेत. थोडक्यात महाविकास आघाडी सरकार जनतेचे प्रश्न सोडविण्या ऐवजी प्रश्नच तयार करतात.

आ.जयकुमार रावल म्हणाले की, ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष केला नाही तर पुढची पिढी माफ नाही करणार म्हणून आरक्षणासाठी ओबीसी समाजाने एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज आहे.

आपल्या समारोपपर भाषणात माजी केंद्रीय मंत्री हंसराज आहेर म्हणाले की, भाजपा हा ओबीसी समाजाचे हितासाठी काम करणारा पक्ष असून ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून जन जागर अभियान राबवून गावागांवापर्यत पोहोचवावे व जन जागर अभियान प्रभावीपणे राबवावे असे ते म्हणाले. आरक्षण मिळविण्यासाठी सर्वानी एकजुटीने प्रयत्न केल्यास हमकास यश येईल असे ते म्हणाले. यावेळी आ.देवयांनी फरांदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी नाशिक प्रभारी आ.जयकुमार रावल, माजी केंद्रीय मंत्री हंसराज आहिर, भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी संजय कुटे, प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री राम शिंदे, प्रदेश सरचिटणीस आ.प्रा.देवयानी फरांदे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष गिरीष पालवे, आ.सिमा हिरे, आ.राहुल ढिकले, धुळयाचे महापौर नाना कर्पे,

प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, जेष्ठ नेते विजय साने, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगुरकर, सुनिल केदार, जगन अण्णा पाटील, सुनिल बच्छाव, सभागृह नेते कमलेश बोडके, गटनेते अरुण पवार, ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस शंकरराव वाघ, भाजपा ओबीसी मोर्चा अध्यक्ष चंद्रकांत, नाशिक जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष संजय शेवाळे, शहर सचिव संतोष नेरे , तसेच नाशिक शहर ओबीसी मोर्चा सरटणीस सतिष रत्नपारखी, उपाध्यक्ष राजेंद्र कोरडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकरराव वाघ यांनी केले, पाहुण्यांचे स्वागत गिरीष पालवे यांनी केले व सुत्रसंचलन सुनिल केदार यांनी केले तर आभारप्रदर्शन चंद्रकांत थोरात यांनी केले.

Related Stories

No stories found.