जिल्ह्यात दिवसभरात १०० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
करोना

जिल्ह्यात दिवसभरात १०० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

मागील चोवीस तासात ११३ रुग्णांची करोनावर मात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दिवसभरात १०० जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह (corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात ११३ रूग्णांनी करोनावर मात केली.०१ रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा ८ हजार ६२४ इतका झाला आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील २४ तासात १०० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) शहरातील संख्या ४३ इतकी आहे. आज ग्रामिण भागात ५१ रुग्णांची मालेगाव मनपा ०२ तर, जिल्हाबाह्य ०४ रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज ०१ करोना रुग्णाचा मृत्यू झाला (Death Of Corona Patients) यात नाशिक ग्रामीण विभागातील ०१ रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा ८ हजार ६२४ इतका झाला आहे.

Related Stories

No stories found.