कोविड चाचणी
कोविड चाचणी
नाशिक

दहा मिनिटात होणार कोविड टेस्ट

पाच हजार किट मिळणार

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : नाशिक महानगरपालिका क्षेत्रात करोना विषाणुचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता आसीएमआरची मदत मिळणार आहे. जलदगतीने संशयित किंवा बाधीतांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी तात्काळ होण्यासाठी नाशिक महापालिकेला दोन दिवसात पाच हजार अ‍ॅन्टीजेन किट उपलब्ध होणार आहे. या अ‍ॅन्टीजेन चाचणीच्या माध्यमातून अवघ्या दहा मिनीटात करोनाची चाचणी होणार असल्याने अशा रुग्णांवर तातडीने उपचार होऊन त्यांच्यापासुन होणारा संसर्ग रोकण्यास मोठी मदत होणार आहे.

नाशिक महापालिका क्षेत्रात माठ्या प्रमाणात करोना संसर्ग सुरू झाला असुन असुन दररोज पाऊणे दोनशे नवीन रुग्ण समोर येऊ लागले आहे. यामुळे या रुग्णांच्या संपर्कात आलेले अतिजोखमीचे व कमी जोखमीच्या व्यक्तींचा आकडा देखील चारशेच्यावर गेला आहे. शहरात करोना बाधीतांचा आकडा तीन हजाराजवळ पोहचला असुन मृतांची संख्या सव्वाशेच्या वर गेली आहे.

अशाप्रकारे करोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी महापालिकेकडुन आयसीएमआर यांच्याकडे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अ‍ॅन्टीजेन टेस्ट किटची मागणी केली होती. ही मागणी लाखात असली तरी तुर्त आयसीएमआर कडुन ५ हजार अ‍ॅन्टीजेन टेस्ट किट नाशिक महापालिकेला पाठविण्यात आले असुन येत्या दोन तीन दिवसात ते मिळणार आहे. या अ‍ॅन्टीजेन टेस्ट कियच्या माध्यमातून केवळ पाच ते दहा मिनीटात करोनाची चाचणी होणार आहे. सध्या ज्या प्रमाणात करोना रुग्ण समोर येत आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेले अति व कमी जोखमीच्या व्यक्तींची तातडीने चाचणी करता येऊन संसर्ग रोकण्यात या चाचणीने मोठी मदत होणार आहे.

तसेच महापालिकेकडुन आयसीएमआर यांच्याकडे १ ला अ‍ॅन्टीबॉडी टेस्ट किटची मागणी देखील केली आहे. या दोन्ही टेस्ट पुढच्या काही दिवसात सुरु झाल्यास करोना संक्रमण रोकण्यात महापालिकेला यश येणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com