के.के.वाघ शिक्षण संस्थेची गुणवत्ता वाखाणण्यासारखी - आ.डॉ. तांबे

वाघ शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन संजय गिते यांचा सेवानिवृत्त समारंभ
के.के.वाघ शिक्षण संस्थेची गुणवत्ता वाखाणण्यासारखी - आ.डॉ. तांबे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

के.के. वाघ शिक्षण संस्थेने (K.K.Wagh Education Institute) प्रथमपासून गुणवत्तेच्या आधारे शिक्षकांना नोकरीची संधी दिलेली आहे. यामुळे संस्थेचे प्रत्येक शाखेची गुणवत्ता वाखाणण्यासारखी आहे, असे प्रतिपादन आ.डॉ. सुधीर तांबे (MLA Sudhir Tambe) यांनी केले आहे...

गीताई वाघ कन्या विद्यालय भाऊसाहेबनगर येथील उपशिक्षक, शिक्षक संघटनचे नेते, वाघ शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन संजय गिते यांच्या सेवानिवृत्त समारंभात डॉ. तांबे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अजिंक्य वाघ होते.

यावेळी डॉ. तांबे म्हणाले, शिक्षकांचे काम आणि कार्य यामुळे संस्थेच्या लौकिकात भर पडते. विदयार्थी वर्गाचा विकास होतो. संजय गिते यांच्यासारखे काम प्रत्येक शिक्षकांनी करावे,असे आवाहनही त्यांनी केले.

तर आ.किशोर दराडे (MLA Kishor Darade) म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. त्याचा अवलंब करावाच, मात्र शिक्षक वर्गाने चौफेर काम करावे.कला क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात काम करावे. एक आदर्श  निर्माण केला तर विद्यार्थी वर्गास प्रेरणा मिळते. संजय गिते यांनी शिक्षण, पत्रकार, संघटना,सहकार क्षेत्रात काम केले, असे काम करण्याची प्रेरणा इतरांनी घ्यावी असे त्यांनी सांगितले.  

याप्रसंगी माजी आमंदार नानासाहेब  बोरस्ते, माणिकराव बोरस्ते, पंढरीनाथ थोरे, दिगंबर गिते, रविंद्र मोरे, यशवंत ढगे,जयश्री पानगव्हाणे, उज्वला ठोंबरे,संजय धनगर,राजेंद्र धिवर आदींची भाषणे झाली. तसेच सत्कारार्थी संजय गिते यांनी सत्काराला उत्तर दिले. तर सूत्रसंचालन राजेंद्र उगले व चंद्रकांत कुशारे यांनी केले.

दरम्यान, यावेळी अमृता पवार,प्रशांत आव्हाड,रमेशचंद्र घुगे,विश्वास कराड,शिवाजीराव निरगुडे,बाळासाहेब ढोबळे, मोहन चकोर,साहेबराव कुटे,छोटु शिरसाट, एस. बी.शिरसाट,अशोक पाटील,संदिप किर्वे,सोमनाथ काळे,लक्ष्मण महाडिक, अॅड.रामनाथ शिंदे,अण्णा पा.बोरगुडे पंडीत आहेर,तानाजी पुरकर,दगु पा.नागरे,शशिकांत गिते,आनंदा गिते,मनोज गिते,पंडीत गिते,यांच्यासह माजी विदयार्थी, पालक,शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com