प्रस्तावित दरवाढ रद्द करावी; आम आदमी पार्टीची मागणी

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
प्रस्तावित दरवाढ रद्द करावी; आम आदमी पार्टीची मागणी

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

महावितरणची (MSEDCL) प्रस्तावित दरवाढ रद्द करावी, या मागणीसाठी आम आदमी पार्टीतर्फे (Aam Aadmi Party) सोमवारी (दि.२७ ) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collector Office) आंदोलन (agitation) करण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन (memorandum) देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, महावितरणकडून लॉकडाऊन (Lockdown) काळात दि,1 एप्रिल 2020 पासून 20 टक्के वीज दर वाढ (Electricity tariff increase) करण्यात आली होती त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज ही महाराष्ट्रात आहे. तरीही आता वीज कंपन्यांकडून वीज दर वाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी (election) राज्यातील जनतेला वचन देण्यात आले होते की, शिवसेनेकडून आमचे सरकार आल्यास आम्ही 300 युनिट घरगुती वापरात 30 टक्के स्वस्त विज देऊ.

तसेच भाजपाकडूनही (BJP) विविध राज्यातील निवडणूक (election) जाहीरनाम्यात 100 ते 200 युनिट वीज मोफत देण्याचे जाहीर केले आहे. भाजपनेही विरोधात असताना वीजदर वाढ व मोफत वीज देण्याबाबत अनेक वेळा रस्त्यावरून आंदोलने (agitation) केली आहेत. दिल्लीत अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) सरकार मागच्या आठ वर्षांपासून 200 युनिट वीज मोफत आणि जास्त वापर करणाऱ्यांनाही कमीत कमी दरात वीज पुरवठा (Power supply) करत आहेत.

पंजाबमध्येही (punjab) अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला दिल्ली व पंजाब सरकार प्रमाणे कमीत कमी 200 युनिट वीज मोफत द्यावी, अशी मागणी ही निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देताना चंदन पवार, प्रदीप लोखंडे, दीपक सरोदे, दिलीप कोल्हे, प्रमोदिनी चव्हाण, बाळासाहेब बोडके, जगदीश आखणे, चंद्रशेखर महानुभाव आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com