दिंडोरी | Dindori

श्री सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या कार्यकारीणीची मुदत संपत आल्याने नव्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथील श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड या विश्वस्त संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाची मुदत संपत असल्या कारणाने नव्याने विश्वस्त मंडळ नेमणूक प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली आहे.

विश्वस्त पदासाठी पात्र व ईच्छुकांनी आपला अर्ज प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश, नाशिक, जिल्हा सत्र न्यायालय, नाशिक यांच्या नावे गुरुवार, (दि. १०) सप्टेंबर पूर्वी रजिस्टर पोस्टाद्वारे पाठवावा अथवा स्वहस्ते जमा करून त्यांची पोहच प्राप्त करून घ्यावी.

सदरची विश्वस्त पदाची नेमणूक ही नियोजनानुसार ५ वर्षाच्या कालावधीसाठी असून, अर्जदाराचे किमान वय २१ वर्ष पूर्ण व तो नाशिक जिल्ह्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे. अर्जासोबत अर्जदाराचा अल्पपरीचय तसेच विश्वस्त होणेकामी नियोजित उद्देशाने स्पष्टीकरण असणे आवश्यक आहे.

अशी माहिती विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री गणेश देशमुख यांनी दिली.