दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाच्या समस्या काही संपेना

दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाच्या समस्या काही संपेना

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

सध्या जिल्ह्यात सर्वत्र आयुष्यमान आरोग्य मेळाव्याचे (ayushman aarogya melava) उद्घाटन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांच्या उपस्थितीखाली पार पडत आहे....

एकीकडे गोरगरीब जनतेला आरोग्यांच्या सेवा देण्यासाठी तत्परता दाखविली जात आहे. तर दुसरीकडे ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) सर्व सामान्य रुग्णांची हेळसांड होत असल्याच्या तक्रारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्याच्या मतदार संघातील दिंडोरी रुग्णालयातच येत असल्याने दिंडोरी ग्रामीण रुग्णालयातील (Dindoti Rural Hospital) तक्रारी कधी कमी होणार? असा सवाल दिंडोरी नगरपंचायतीच्या बाजार समिती सभापती शैला उफाडे (Shaila Ufade) यांनी उपस्थित केला आहे.

दिंडोरी तालुका हा गोरगरीब जनतेचा आदिवासी तालुका (Tribal Taluka) आहे. सर्व सामान्य कुटूंबातील लोक सरकारी दवाखान्यावर (Government Hospital) अवलंबून असतात. विशेषत: गरोदर माता पूर्णत: सरकारी दवाखान्यावर अवलंबून असतात. गरोदर मातांना आवश्यक सेवा स्थानिक ठिकाणी मिळत असले तरी प्रसुतीच्या वेळी आवश्यक त्या सुविधा मिळत नसल्याने तिची हेळसांडच होते, याची प्रचिती दिंडोरी तालुक्यात बघावयास मिळते.

दिंडोरी शहरातील विठ्ठलनगर (Vitthalnagar) येथील गरोदर माता रंजना उमेश शिंदे (Ranjana Shinde) ही प्रसुतीसाठी सकाळी 6 वाजता दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात गेली असता हजर असलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्रसुतीसाठी वेळ असल्याचे सांगून तिला घरी पाठवले.

त्यानंतर काही वेळाने घरी त्रास जाणवू लागल्याने त्या मातेला पुन्हा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी गरोदर मातेची तपासणी करुन बाळाच्या हद्याचे ठोके कमी पडत असल्याने मातेला व बाळाच्या जीवितेला धोका असल्याचे सांगून या मातेला जिल्हा रुग्णालयात घेवून जाण्याचा सल्ला दिला.

जीवितेला धोका असल्याचे समजातच नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. त्यानंतर त्यांनी पैशांची जमाजमव करुन खासगी रुग्णालयात (Private Hospital) नेण्याचा निर्णय घेतला. खासगी रुग्णालयात दाखल करताच अर्धा तासाच्या आत या मातेची सुरक्षित नैसर्गिक प्रसुती (Delivery) झाली. बाळाची प्रकृती उत्तम असल्याचे खाजगी डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या जबाबदारी झटकण्याच्या प्रकारामुळे सर्व सामान्य कुटूंबांना खाजगी रुग्णालयात जावून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्याचबरोबर नातेवाईकांना प्रचंड मानसिक त्रासास सामोरे जावे लागत आहे.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी या प्रकाराकडे लक्ष देवून या चुकीच्या प्रकाराला आळा बसविण्याची गरज आहे. मागील काही दिवसांपूर्वी तालुक्यातीलच लखमापूर (Lakhmapur) येथील गरोदर मातेला व नातेवाईकांना मानसिक त्रासास सामोरे जावे लागले होते.

त्यावरुन डॉ. भारती पवार यांनी दखल घेत रुग्णालयांची चौकशी सुरु करणार असल्याचे आश्वासन दिले होते. ती चौकशी पूर्ण झाली की नाही याबाबत माहिती मिळाण्याच्या आतच दिंडोरीतील रुग्णालयात पुन्हा एकदा गरोदर मातेची जबाबदारी झटकण्याचा प्रकार उघडकीस आल्याने संताप व्यक्त होत आहे.

तरी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यावर कठोर पाऊले उचलत जबाबदारी झटकून कर्तव्यापासून पळ काढणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी दिंडोरी नगरपंचायतीच्या बाजार समिती सभापती शैला उफाडे यांनी केली आहे.

आज केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री दिंडोरी दौर्‍यावर

दिंडोरी तालुक्यात आज केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत आयुष्यमान आरोग्य मेळाव्याचे उदघाटन होणार आहे. या कार्यक्रमाला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) हे उपस्थित राहणार आहे. एकीकडे गोरगरीबांना आरोग्याच्या सोयी उपलब्ध करुन देण्यासाठी चांगला प्रयत्न होत असला तरी दुसरीकडे जबाबदार्‍या झटकत सर्व सामान्य रुग्णांची हेळसांड करणार्‍या शासकीय रुग्णालयांवर कोणती कारवाई होणार? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाबाबत येंत असलेल्या तक्रारी नक्कीच निंदणीय आहे. त्याचे समर्थन कुणीही करणार नाही. तक्रारी कमी होवून गोरगरीबांना मुबलक सुविधा मिळाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आज दिंडोरीत आयुष्यमान आरोग्य मेळाव्यानिमित्त केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार, विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. हे सर्व प्रकार मी आरोग्य सभापती म्हणून त्यांच्या निदर्शनास आणून देणार असून दिंडोरीतील ग्रामीण रुग्णालयात अशा तक्रारी पुन्हा निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक ते कायदेशीर मार्गाचा अवलंब करु.

- निर्मला मवाळ, आरोग्य सभापती.

Related Stories

No stories found.