समस्या दिंडोरीची: पुरवठा विभागात रेशनकार्डच नाही; पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी

समस्या दिंडोरीची: पुरवठा विभागात रेशनकार्डच नाही; पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी

दिंडोरी । संदीप गुंजाळ | Dindori

नाशिक जिल्हा (nashik district) म्हंटला की भुजबळ हे समीकरण जुळलेले आहे. ना. भुजबळ नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister of Nashik District) असल्याने नागरीकांच्या प्रत्येक अडचणीवर त्यांच्याकडे तोडगाच असतो याची चर्चा सर्वत्र आहे.

परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) ज्या विभागाचे मंत्री आहेत, त्याच विभागाला सर्वसामान्य नागरीक कंटाळले असून पुरवठा विभागात (Supply department) रेशनकार्ड (rashan card) मिळवण्यासाठी चकरा माराव्या लागत आहेत. परंतु मागील चार महिन्यांपासून कोरे रेशनकार्ड नसल्याने अवघ्या जिल्ह्यात पुरवठा विभागावर नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री (Minister of Food and Civil Supplies of the State of Maharashtra) नामदार भुजबळ साहेबांनीच या प्रकरणात लक्ष घालावे अशी अपेक्षा ग्रामीण भागातून व्यक्त केली जात आहे.

गेल्या पाच महिन्यांपासून नागरिकांची रेशनकार्ड (rashan card) मिळण्यासाठी धावपळ चालू आहे. वारंवार संबंधित पुरवठा अधिकार्‍यांकडे चकरा मारत रेशनकार्ड कधी मिळेल ? याबाबत विचारणा करीत असले तरी संबंधित अधिकार्‍यांकडून ते रेशनकार्ड कधी मिळेल, याची शाश्वती मिळत नाही. राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या (Department of Food and Civil Supplies) वतीने ऑनलाईन रेशनकार्ड प्रणाली (Online ration card system) सुरु करण्यात आली असली तरी यात रोजच नव्या त्रुटी आढळून येत आहे. मागील दोन ते तीन महिन्यांपासून ऑनलाईन नोंदणी (online registration) देखील बंद असलेले नव्याने रेशनकार्ड काढलेल्या तसेच नवीन नावे दाखल झालेल्या नागरिकांना धान्य मिळणे कठीण झाले आहे.

पुरवठा विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांकडे गेल्यास ऑनलाईन प्रणाली बंद असल्यामुळे नावे दाखल करण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले जाते. ऑनलाईन प्रणाली चालू झाल्यावर लवकरच नावे दाखल करण्याचे आश्वासन संबंधित विभागाकडून मिळत असले तरी ती कधी सुरु होणार ? असा सवाल ग्रामीण भागातून विचारला जात आहे. ऑनलाईन प्रणालीमध्ये कुटूंबातील प्रत्येक सदस्याचे आधारकार्ड लिंक केल्यानंतर त्या रेशनकार्डला 12 अंकी नंबर प्राप्त होतो. त्यानंतर उत्पन्नाच्या अटीवर पात्र कुटूंबाना स्वस्त धान्याचा लाभ दिला जातो. मात्र नवीन वर्षापासून त्या प्रणालीमध्ये दोष आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

दिंडोरी तालुक्याचा (dindori taluka) विचार केला तर जवळपास दोन हजार रेशनकार्डचे अर्ज प्रलंबित आहे. पुरवठा विभागाकडे अत्यावश्यक कारणासाठी लागणार्‍या रेशनकार्ड देखील उपलब्ध नाही हे विशेष ! आरोग्यासाठी जर एखाद्या व्यक्तीला अत्यावश्यक रेशनकार्ड लागले तर त्यास रेशनकार्ड देण्यासाठी दिंडोरी पुरवठा विभागाकडे (Dindori Supply Department) कोरे रेशनकार्ड उपलब्ध नाही.

यामुळे संबंधित गरजू लाभार्थी आपल्या शासकीय योजनेंपासून वंचित राहु शकतो. जिल्हास्तरावरुन संबंधित विभागाने एकत्रित मागणी केली असल्याचे माहिती मिळत असले तरी अजुन किती दिवस रेशनकार्डसाठी वाट बघावी लागणार ? हा एक संशोधनाचा विषय ठरला असून नागरिकांचा अंत न बघता संबंधित विभागाने रेशनकार्ड त्वरीत मिळतील, अशी व्यवस्था करावी, त्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे अन्न व पुरवठामंत्री ना. छगन भुजबळ यात लक्ष केंद्रीत करुन लवकरच यावर तोडगा काढून रेशनकार्डांची पुर्तता करुन देतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

संपूर्ण जिल्ह्यामध्ये रेशनकार्डचा तुटवडा आहे. संपूर्ण जिल्ह्याने जवळपास 60 हजार रेशनकार्डची मागणी केली आहे. त्याप्रमाणे त्या रेशनकार्डची छपाई लवकरच पूर्ण होवून तालुक्यालाही मुबलक प्रमाणात रेशनकार्ड प्राप्त होतील.

- पंकज पवार, तहसीलदार दिंडोरी

पाच महिन्यांपासून रेशनकार्डसाठी सर्व सामान्य नागरिक चकरा मारत आहे. परंतू संबंधित विभागाकडून फक्त वेळकाढूपणा चालू आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे अन्न व पुरवठामंत्री ना. भुजबळ साहेबांनी यात लक्ष घालून जिल्ह्याला रेशनकार्डाची पुर्तता करुन द्यावी, अशी मी सर्व सामान्य नागरिकांच्या वतीने मागणी करते.

- शैलाताई उफाडे, सभापती - बाजार समिती दिंडोरी नगरपंचायत

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com