समस्या दिंडोरीची: दहावा मैल चौफुलीवर उड्डाणपूलाची प्रतिक्षा

बोगद्याऐवजी उड्डाणपूलाची मागणी अंगलट?
समस्या दिंडोरीची: दहावा मैल चौफुलीवर उड्डाणपूलाची प्रतिक्षा

दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori

राष्ट्रीय महामार्ग (National Highway) क्रमांक 3 वरील दहावा मैल येथील चौफुलीवर कायम अपघात होत असतात. कित्येकांना आपला जीव देखील गमवावा लागला. तेथे उड्डाणपूल (flyover) व्हावा, यासाठी कित्येक वर्षांपासून मागणी होत असतांना अद्यापही ती मागणी पूर्ण होतांना दिसत नाही.

अजुन किती बळी गेल्यानंतर संबंधित विभाग दखल घेईल ? असा संतप्त सवाल नागरिक विचारत असुन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar) यांनी या मागणीला गती देवून लवकरात लवकर उड्डाणपूलाच्या कामाला सुरुवात करावी अशी मागणी केली जात आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील दहावा मैल चौफुली हे अपघात क्षेत्र निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. कित्येकांना अपंगत्व तर कित्येकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रस्ता ओलांडताना वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून रहावे लागते ही वस्तुस्थिती आहे . विमानतळावर (airport) सध्याला रहदारीचे प्रमाण वाढले असून गुजरातला (gujrat) जाणारा हा जवळचा मार्ग असल्याने वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच जानोरी (janori) परिसरातील औद्योगिक वसाहतीतील (Industrial colonies) अवजड वाहने देखील याच मार्गाने जात असल्याने रहदारीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.

हा रस्ता गुजरात (gujrat) - शिर्डीला (shirdi) जोडणारा जवळचा रस्ता असुन वणी- सप्तशृंगी देवीभक्तांसाठीही हा सोयीस्कर मार्ग आहे. रोजची रहदारी मोठ्या प्रमाणात असुन अवजड वाहनांचीही वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण (Former MP Harishchandra Chavan) यांनी आपल्या कार्यकाळात अपघातांचे प्रमाण बघता येथे बोगदा मंजूर केला होता. परंतु कार्गो तसेच जानोरी येथील औद्योगिक वसाहतीतुन मोठमोठे कंटेनर तसेच अवजड वाहने ये -जा करत असल्याने साधारण बोगद्यातून ते निघणे जिकिरीचे होईल.

तसेच पुढे शिर्डीकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने त्याबाजुनेही वाहने ये जा करतात. त्यामुळे वाहनांना अंदाज येवू न शकल्याने अपघाताचे (accidents) प्रमाण अधिक वाढेल यासाठी तेथे बोगद्या ऐवजी उड्डाणपूलाची (flyover) मागणी करण्यात आली. त्या मागणीला दोन वर्ष उलटून गेले तरी उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात झाली नाही. रोजचे अप्घात बघता उड्डान पुलाचा हट्ट उगाच केला तो बोगदाच बरा होता, अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. तरी निष्पाप लोकांचा बळी जाऊ न देता लवकरात लवकर येथे उड्डाण पूलाचे काम सुरु करावे, अशी मागणी होत आहे.

आणखी किती दिवस लागणार ?

विद्यमान खासदार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांच्याकडे बोगद्याऐवजी उड्डाणपूलाची मागणी (Demand for flyover) करण्यात आली. त्यावर विमानतळावर जाताना रा.म.क्र. 3 वरील दहावा मैल फाट्यावर नक्कीच रहदारी व वाहनांची परिस्थिती बघता नक्कीच तेथे बोगद्याऐवजी उड्डाणपूलाची गरज आहे. तेथे मंजुर झालेले पुल नेमके कोणत्या पद्धतीचे आहे व ते तेथे योग्य आहे की नाही याची पुर्णतः माहीती घेवुन मी स्वतः पाठपुरावा करेन.

आणि भविष्यात पुढच्या 25 वर्षाचा विचार करून तेथे उड्डाणपूलाचीच पुर्तता करण्यासाठी आपण प्रयत्न करणार. त्यासाठी येथील परीस्थिती वरिष्ठांना लक्षात आणून देवून गरज पडल्यास सुधारीत निविदा तयार करण्यात येईल त्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करेल असे आश्वासन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले होते. परंतु ते काम दोन वर्षे उलटूनही सुरू न झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

दहावामैल वरील चौफुली हे अपघाताचे केंद्र बनले आहे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या व अपघातात वाढ होत आहे. कित्येकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे येथे लवकरात लवकर उड्डाणपूल होणे अपेक्षित आहे. संबंधित विभागाने व लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून उड्डाणपुलाच्या कामाला तात्काळ सुरूवात होईल त्यादृष्टीने हालचाली सुरू करणे आवश्यक आहे. जेणेकरून निष्पाप लोकांना जीव गमवावे लागणार नाही व वाहतूक सुरळीत तसेच सुरक्षित होईल.

- गणेश तिडके, युवानेते, जानोरी

दहावा मैल येथील रा.म.क्र.3 वरील फाट्यावर साधारण बोगदा मंजूर झाला होता परंतु त्या बोगद्यातून मोठे कंटेनर, अवजड वाहने घेवुन जाणे जिकिरीचे होईल त्यांमुळे तेथे बोगदा ऐवजी उड्डाणपूलाची मागणी आम्ही केली असुन त्यासंबंधी खासदार डॉ. भारतीताई पवार यांनी वरिष्ठ पातळीवर याविषयी पाठपुरावा करून तेथे बोगद्याऐवजी उड्डाणपूल करण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती मी नागरिकांच्यावतीने केली होती. परंतु अद्याप त्याला यश आले नाही. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार लवकरात लवकर या मागणीची नक्कीच दखल घेवून विषय मार्गी लावतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.

- तुकाराम जोंधळे, राष्ट्रवादी युवानेते

Related Stories

No stories found.