संधीचे सोने करण्याचे महिलांमध्ये सामर्थ्य

संधीचे सोने करण्याचे महिलांमध्ये सामर्थ्य

नाशिक । प्रतिनिधीे Nashik

घरातून प्रोत्साहन मिळाले तर कोणतीही स्त्री घराबाहेर पडून आपले कर्तृत्व सिद्ध करु शकते. जिथे महिला काम करीत नाहीत, असे एकही क्षेत्र आज राहिलेले नाही. महिलांना योग्य संधी मिळाल्यास त्या नक्कीच प्रभावी कामगिरी करून नवा आदर्श निर्माण करु शकतात, असे प्रतिपादन एसटी महामंडळात MSRTC वाहक conductor म्हणून कार्यरत असलेल्या मनीषा खैरनार Manisha Khairnar यांनी केले.

नवरात्रोत्सवानिमित्त Navratri Festival आयोजित ‘देशदूत नवदुर्गा’ Deshdoot- Navdurga कार्यक्रमात खैरनार यांनी मनोगत व्यक्त केले. ‘देशदूत’च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी खैरनार यांच्याशी संवाद साधला. त्यांचे मनोगत जाणून घेतले. महिलांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 2005 साली पहिल्यांदाच निघालेल्या जागेवर त्यांची वाहक म्हणून निवड झाली. त्यावेळी घरून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे आत्मविश्वासाने वेगळ्या क्षेत्रातही काम करीत असल्याचे खैरनार यांनी सांगितले. गेल्या 16 वर्षांपासून त्या प्रवाशांची सेवा करत आहे. आपल्यासाठी प्रवासी हेच दैवत असल्याचे त्या सांगतात.

अतिशय धावपळीच्या व दगदगीच्या नोकरीची सुरुवात कशी झाली याचीही माहिती त्यांनी दिली. मुलीला तिच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळाला की ती तिच्या आयुष्यातील कोणत्याही अडथळ्याविरोधात उभी राहू शकते. वाहक म्हणून नोकरी करण्याचे श्रेय माझ्या सासूबाईंना द्यायला आवडेल. वाहकपदासाठी मी अर्ज भरल्यापासून माझ्या पाठिशी सासूबाई, पती आणि घरातील सगळेच होते. त्या जोरावर आजही माझी वाटचाल सुरू आहे. बोलक्या स्वभावामुळे ज्या-ज्या मार्गावर वाहक म्हणून काम केले त्या प्रत्येक मार्गावर आपल्याला मैत्रीचा खजिना मिळाला. एक वेगळे बंध त्यांच्याशी जुळले. यात काहींसाठी ताई, मावशी, मॅडम तर वडीलधार्‍या ग्रामीण वयस्कर महिला ‘बाई’ म्हणूनही हाक मारतात, असे खैरनार यांनी सांगितले.

काम करताना सुरुवातीला वातावरण आणि गर्दीत जुळवून घेण्यासाठी काही समस्या भेडसावल्या, पण आता अनुभवातून रोजचा प्रवास आणि प्रवासी सवयीचे झाले आहेत. अनेकदा लोकांना त्यांच्या इच्छित स्थळी वेळेत पोहोचण्यासाठी काम करतो त्याबद्दल अभिमान वाटतो, असे त्या म्हणाल्या.

कामाचा गणवेश कर्तव्य पार पाडण्याची शक्ती देतो. वेळापत्रकनुसार बर्‍याचदा रात्री किंवा पहाटे कामावर जावे लागते, पण इतर वरिष्ठ अधिकारी, पुरुष सहकारी एक सहकारी या नात्याने नेहमीच मदत करतात. कामावर योग्य तो आदर देतात. वेळप्रसंगी आमच्यासाठी उभेदेखील राहतात, ही बाब त्यांनी विशेषत्वाने नमूद केली. मनोबल वाढवणारे देवीचे रूप अधिक भावते, असे सांगून ज्या स्त्रियांना त्यांच्या आयुष्यात काहीतरी करण्याची इच्छा आहे अशा महिलांना आत्मविश्वासाचा मंत्र खैरनार यांनी दिला. प्रत्येक स्त्रीमध्ये क्षमता असते. प्रत्येक महिलेत दुर्गा असते. तिने स्वतःला शोधले पाहिजे. तुम्हाला यश मिळवण्यापासून थांबवेल, अशी कोणतीही गोष्ट कारण जगात नाही, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.