‘नगराध्यक्ष’ पदाची संगीत खुर्ची होऊ नये

‘नगराध्यक्ष’ पदाची संगीत खुर्ची होऊ नये

सटाणा । शशिकांत कापडणीस Satana

नगर परिषद निवडणुकीचा (Municipal council elections) अधिकृत कार्यक्रम तसेच नगराध्यक्ष (Mayor) पदासाठी असलेले आरक्षण (Reservation) अद्याप जाहीर झाले नसले तरी इच्छुकांतर्फे होत असलेल्या रणनीतीमुळे निवडणूक (election) रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

जनतेतून थेट नगराध्यक्ष झालेले व नगरसेवकांमधून झालेल्या नगराध्यक्षांचा प्रभाव लक्षात घेता, विकासाच्या दृष्टीकोनातून सलग 5 वर्षे कार्यकाळ नगराध्यक्षांना लाभला पाहिजे, नगराध्यक्ष पद संगीत खुर्चीचा खेळ ठरू नये अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जात आहे. 1 जानेवारी 1954 रोजी स्थापना झालेल्या सटाणा (satana) नगर परिषदेत आजपर्यंतच्या एकूण 25 नगराध्यक्षांमध्ये लोकनेते स्व. पंडितराव धर्माजी पाटील (Late. Panditrao Dharmaji Patil), स्व. अर्जुनराव जगन्नाथ आहिरे (Late. Arjunrao Jagannath Ahire) व सद्यस्थितीत सुनिल दोधा मोरे यांना प्रत्येकी 5 वर्षांसाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष होण्याची संधी प्राप्त झाली आहे.

नगरसेवकांमधून झालेल्या नगराध्यक्षांमध्ये स्व. दामू नानाजी सोनवणे, स्व. यादवराव झिप्रु सोनवणे, स्व. रामदास लक्ष्मण सोनवणे, स्व.अनाजी अभिमन सोनवणे, स्व.नारायण केदु येवला, स्व.त्रंबक खंडू सोनवणे, स्व. अभिमन त्रंबक रौदळ, स्व. किसनराव बापुराव वाघ, स्व. कृष्णा नानाजी देवरे, स्व. माधवराव अभिमन सोनवणे, स्व. मधुकर भिमराव सोनवणे,

बाळासाहेब जगन्नाथ सोनवणे, स्व. तुकाराम गणपत सोनवणे, उत्तराताई अभिमन सोनवणे, विजयराज किसनराव वाघ, संजय कांतीलाल चव्हाण, पांडुरंग काशीराम सोनवणे, सुमनताई दगाजी सोनवणे, भारत रामचंद्र खैरनार, कौशल्याताई पांडुरंग सोनवणे, सुशिलाताई दादाजी रौदळ, स्व. सुलोचना कांतीलाल चव्हाण आदींचा समावेश आहे.

या नगराध्यक्षांमध्ये काही पिता-पुत्र व पती-पत्नी तसेच आई व मुलगा अशा पद्धतीने नगराध्यक्षांचा कार्यकाळ राहिला आहे. काही नगराध्यक्षांना दोन-तीन वेळा नगराध्यक्षपदाची संधी प्राप्त झाली. परंतु त्यांना सलग पाच वर्षांचा कार्यकाळ प्राप्त होऊ शकला नाही. एखादी योजना शासनाकडे प्रस्तावित केल्यानंतर प्रत्यक्षात मंजुरी व कार्यवाहीपर्यंत नगराध्यक्ष बदलत असतील तर,

विकासकामे साकारण्यात अनेक अडचणी उभ्या ठाकतात. तसेच कामाचे श्रेय नेमके कुणाचे यावरून देखील वादविवाद (Debate) झडत असतात. पाच वर्षाचा कार्यकाळ योजनेच्या पुर्तीसाठी निश्चितच महत्वपुर्ण ठरतो. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण कुठलेही निघो परंतू कार्यकाळ पाच वर्षाचा ठेवला पाहिजे, अशी जनतेची रास्त अपेक्षा आहे.

शहराच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या असलेल्या आधी केळझर व सद्यस्थितीत पुनद पाणी पुरवठा योजनेभोवती (Water supply scheme) राजकारण (Politics) चर्चेत आहे. यापूर्वीच्या काळात सटाणा नगर परिषद प्रशासकीय इमारत, शहरातील 8 जलकुंभ, जिजामाता उद्यान, ठेंगोडा पाणी पुरवठा योजना, शहरातंर्गत 4 विहीरी, अमरधाम, मटण मार्केट, बाजार ओटे, समाज मंदिर, 4 व्यापारी संकुल, वैकुंठधाम,

जलशुद्धीकरण केंद्र (Water Purification Center), जुन्या गावातील सर्व रस्ते काँक्रीटीकरण (Road concreting), 6 पुतळे व हुतात्मा स्मारक (Martyrs Memorial) तसेच अलीकडच्या काळातील पुनद पाणी पुरवठा योजना, रिंग रोड, स्कायवॉक, नाना नानी पार्क, देवमामलेदार स्मारक नुतनीकरण, बर्‍याच खुल्या जागांचा विकास आदींसह विकासकामे झाली आहेत. कमी कालावधी लाभलेल्या नगराध्यक्षांनी देखिल शहराच्या विकासात योगदान दिले आहे.

शहराच्या इतिहासात नगर परिषदेत नगराध्यक्ष झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था (Local self-government bodies) अंतर्गत विधान परिषदेतून लोकनेते स्व.पंडितराव धर्माजी पाटील आमदार (mla) झाले. नंतरच्या काळात अशी संधी बागलाण विधानसभा मतदार संघातून (Baglan Assembly constituency) संजय कांतीलाल चव्हाण यांना प्राप्त झाली. प्रामुख्याने ग्रामीण भागातील राजकारणात ग्रामपंचायत,

पंचायत समिती (panchayat samiti), जिल्हा परिषदेनंतर (zilha parishad) नगर परिषदेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राज्यपातळीवर नेतृत्वाची संधी प्राप्त होऊ शकते. त्यासाठी प्रभावी वक्तृत्व, व्यापक जनसंपर्क, संघटन कौशल्य, शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची क्षमता यासोबतच पुरेसा कार्यकाळ देखील आवश्यक आहे. जनतेतून झालेल्या थेट नगराध्यक्षांचा कारभार एकाधिकारशाहीकडे झुकत असल्याची नगरसेवकांकडून टीका होत असल्यामुळे, शासनाने सर्व नगरसेवकांना

विश्वासात घेऊन कारभार व्हावा, या उद्देशाने नगरसेवकांमधुन नगराध्यक्ष निवड निश्चित केली आहे. परंतु नगराध्यक्ष पदासाठी संगीत खुर्चीचा खेळ होऊ नये, नागरी सुविधा निर्माण करतांना रचनात्मक काम होण्यासाठी जनतेतून अथवा नगरसेवकांमधुन कुठल्याही पध्दतीने नगराध्यक्ष निवड झाली, तरी कार्यकाळ मात्र 5 वर्षांचा असावा अशी मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com