पोलीस दूरक्षेत्र इमारतीची दुरवस्था

पोलीस दूरक्षेत्र इमारतीची दुरवस्था

सुरगाणा । प्रतिनिधी Surgana

सुरगाणा तालुक्यातील (Surgana) प्रमुख बाजारपेठ (Market) असलेल्या उंबरठाण पोलीस दूरक्षेत्र इमारतीची अवस्था दयनीय झाल्याने जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांचीच सुरक्षा वार्‍यावर असल्याचे बोलले जात आहे.

सुरगाणा तालुक्यात बोरगाव, बार्‍हे व उंबरठाण या महत्त्वाच्या बाजारपेठा आहे. काही वर्षांपुर्वी बार्‍हे येथे स्वतंत्र पोलिस ठाण्याची स्थापना होऊन 61 गावे जोडले आहे. बोरगाव नाशिक सुरत राज्य महामार्गावर (Nashik Surat State Highway) असल्याने परिस्थितीनुसार तेथील दूर अंतरावर चार कर्मचार्‍यांची नियुक्ती (Appointment of staff) होते. मात्र तेथील दूरक्षेत्रावर अंतरावर स्वतःच्या मालकीची इमारत नसल्याने भाडेतत्त्वावर इमारतीत कामकाज सुरू आहे.

बोरगाव प्रमाणेच उंबरठाण गुजरात (Gujrat) राज्याला जोडणार्‍या महामार्गावर आहे. नाशिक (Nashik) पासून गुजरातमध्ये जाण्यासाठी हे जवळचे असल्याने तसेच रस्ता रुंदीकरणाचे काम झाल्यावर भाजीपाला घेऊन जाणारी वाहने याच रस्त्यावरून ये-जा करतात. त्यामुळे नेहमीच वर्दळ असते. उंबरठाण येथे पोलीस दूर क्षेत्राच्या इमारतीसाठी जागा आहे. त्या जागेवर अतिक्रमण झाले.

इमारतीची दुरवस्था झाल्याने पोलिस कर्मचारी जीव मुठीत धरून काम करत असतात. उंबरठाण येथे शनिवारी या आठवडे बाजाराच्या दिवशी पोलिस कर्मचारी (Police personnel) तेथे उपलब्ध असतात. अन्य दिवशी या कर्मचार्‍यांना सुरगाणा पोलीस ठाण्यात (Surgana Police Station) काम करावे लागते. काही घटना घडल्यास माहिती देण्यासाठी पदरमोड करून सुरगाणा येथे यावे लागते. या पार्श्वभूमीवर उंबरठाण येते दूरक्षेत्र इमारतीचे बांधकाम करून कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी नियुक्तीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Related Stories

No stories found.