रस्त्यांना वाली आहे तरी कोण ?

संबंधित विभाग व लोप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी
रस्त्यांना वाली आहे तरी कोण ?

तळेगाव दिं । वार्ताहर | Talegaon

नाशिक (nashik) - दिंडोरी (dindori) - वणी (vani) - कळवण (kalwan) - रस्त्याला खड्यांचे (potholes) साम्राज्य पसरल्याने दुचाकी, चारचाकी स्वरांना रस्त्याने ये - जा करतांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

रात्रीच्या वेळी प्रवास करतांना दुचाकीधारकांना नाशिक - वणी रस्त्यावर (Nashik - Vani road) पाणी असल्याने खड्यांचा अंदाज येत नाही. यामुळे नव्या वाहनांचा अक्ष:रक्षा बोजवारा उडाला आहे. नाशिक - दिंडोरी - वणी - कळवण रस्त्याला नेहमी रहदारी असत. खड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे दुचाकी स्वरांना राञीच्या वेळी खड्यांचा अंदाज येत नाही. नाशिक (nashik) - वणी (vani) - कळवण (kalwan) - अभोणा (abhona) येथील नागरिकांचा दररोजचा या रस्त्याने राबता असल्याने पाठीच्या मणक्यांचे आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नाशिक जिल्ह्यातील (nashik district) दिंडोरी (dindori) येथील श्री स्वामी समर्थ केंद्र, साडेतीन पिठांपैकी अर्धे शक्तीपिठ समजल्या जाणार्या वणी येथील सप्तश्रृंगी गडावर (Saptshringigad) भाविक महाराष्ट्रातुनच (maharashtra) नव्हे तर महाराष्ट्राबाहेरून देखील वणी सप्तश्रृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तीभावाने येतात.

नाशिक कळवण रस्तावरिल खड्डे (potholes) बुजवण्याची मागणी तालुक्यातील शेतकरी (farmers), महाविद्यालयीन विद्यार्थी (students), प्रवासी व वाहनधारक यांच्याकडुन केली जात आहे. खराब रस्त्याअभावी वाहने पंचर होणे, टायर फुटणे, पाटे तुटणे अशा या तक्रारींमुळे चारचाकी वाहनधारक अक्ष:रक्षा धास्तावले आहेत.

रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडल्याने शेतकरी वर्ग नाशिक बाजार पेठेत याच महामार्गाचा वापर करत असतात या महामार्गावरून नाशिक बाजारपेठेत कळवण, अभोणा, आदी ठिकाणांवरून मोठ्या प्रमाणात शेती माल शेतकरी वर्ग आणत असतात. रस्त्याअभावी पुर्ण:ता शेती मालाची वाट लागुन जाते. यामुळे शेतकरी वर्गाला मोठा फटका सहन करावा लागत आहे. तरी नाशिक - दिंडोरी- वणी - कळवण रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी दिंडोरी, कळवण, तालुक्यातील शेतकरी वर्ग, महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरवर्ग, कामगार, प्रवासी आदींकडुन केली जात आहे.

मूलवड - बेज रस्त्याला भगदाड

हरसूल । वार्ताहर

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील व तालुक्याच्या शेवटच्या टोकातील मूलवड - बेज रस्त्याची जोरदार पावसाने मोठी दुरवस्था झाली असून रस्त्याला भगदाड पडले आहे. यामुळे या भागातील दळणवळण पूर्णतः थांबले असून रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. हरसूलसह परिसरात गेल्या आठवडयात तसेच दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा जोरदार पावसाने एन्ट्री केली आहे.

यामुळे पुन्हा एकदा पूर सदृश्य परिस्थितीला ग्रामस्थांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. हरसूलसह परिसरातील मुख्यरस्त्यांसह लहान - मोठ्या रस्त्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसल्याने काही भागात रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे.यात मूलवड - बेज रस्त्याचा समावेश आहे.या भागातील रस्त्याच जोरदार पावसात वाहून गेला असून भले मोठे भगदाड पडले आहे.यामुळे येथील ग्रामस्थांना जाण्या - येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.टाकलेल्या मोर्‍या ही दुरवस्थेत झाल्याने तारेवरची कसरत आणि मुठीत जीव धरून या रस्त्यावरून मार्ग काढावा लागत आहे.

एकदरीत त्या भागातील मुख्य रस्ता असल्याने असून अडचण नसून खोळंबा ठरत आहे.तर अनेक ठिकाणी या रस्त्याची दुरवस्था झाल्याने पायी चालणेही कठीण होत आहे.मात्र संबंधित विभागाने अजून फिरकूनही पाहिले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.दुरवस्था झालेल्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी पूर्णानंद कामडी,वसंत पवार,तुळशीराम खरपडे, चिंतामण जाबर आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com