चोरीच्या घटना रोखण्यास पोलीस अपयशी

शहरासह तालुक्यात गस्त वाढवा; तालुका काँग्रेसची मागणी
चोरीच्या घटना रोखण्यास पोलीस अपयशी

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

शहरासह तालुक्यात दिवसा व रात्री रस्ता लुट, घरफोडी (Burglary) तसेच पाळीव प्राण्यांसह (Pets) वाहनांच्या चोरीच्या (Vehicle theft) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने शेतकर्‍यांसह (farmers) नागरीक त्रस्त झाले आहेत.

पोलिसांचा (police) वचक दिसून येत नसल्यानेच चोरट्यांनी अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे शहरात गस्त वाढविण्यासह चोरट्यांचा बंदोबस्त करावा. तसेच कॉलेज थांबा भागात पोलीस चौकी कार्यान्वित करावी, अशी मागणी तालुका काँग्रेसतर्फे (congress) करण्यात आली आहे.

अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी (Upper Superintendent of Police Chandrakant Khandvi) यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे (Congress district president Dr.Tushar Shewale) यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे (Taluka President Dr. Rajendra Thackeray) यांच्यासह पदाधिकार्‍यांनी निवेदन (memorandum) देत शहरासह तालुक्यातील चोरीच्या वाढलेल्या घटना रोखण्यास पोलीस यंत्रणेस येत असलेल्या अपयशाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पोलीसांचा धाक राहिला नसल्यानेच चोरटे मस्तवाल झाले आहेत.

शहरासह तालुक्यात भरदिवसा चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महिलांचे दागिने ओरबाडणे तसेच घरासमोर व रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी लांबविणे, मोबाईल चोरी (Mobile theft), दुकाने फोडणे, हॉस्पिटलचे मेडीकल व व्यापारी प्रतिष्ठाने फोडून एैवज लांबविला जात आहे. निवासी घरात घुसून चोरी करण्याचे धाडस चोरट्यांचे वाढले आहे.

ग्रामीण भागातून शेतात बांधलेले पशुधन चोरटे वाहनातून लंपास करीत आहेत. यामुळे शेतकरी अक्षरश: हवालदिल झाले आहेत. चोरींच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतांना देखील पोलीस यंत्रणेतर्फे गस्त वाढविण्यात आलेली नाही. तसेच चोरांचा शोध देखील घेतला जात नसल्याने सर्वसामान्य नागरीक-व्यापारी संत्रस्त झाले आहेत.

त्यामुळे शहरासह तालुक्यात पोलिसांची गस्त तातडीने वाढवित पोलीस ठाण्यात दाखल चोरींच्या गुन्ह्यांची त्वरेने उकल करावी यासह कॉलेज स्टॉप परिसरात नागरी वसाहत मोठ्या प्रमाणात असून येथे 24 तास नागरीकांची वर्दळ असते. त्यामुळे या भागात पोलीस चौकी कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी तालुकाध्यक्ष डॉ. ठाकरे यांनी यावेळी बोलतांना केली.

शिष्टमंडळात युवक काँग्रेस अध्यक्ष सुमीत निकम, सेवादल अध्यक्ष सतिष पगार, वाय.के. खैरनार, एस.एस. देवरे, मंगला तलवारे, अनिल भडागे, रवींद्र कुवर, समाधान कुवर, गोरख गायकवाड, राकेश पाटील आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com