जि.प.त पीएमएस प्रणालीने पुन्हा एकदा टाकली मान

ठेकेदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांमध्ये नाराजीचा सूर
जिल्हा परिषद
जिल्हा परिषद

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

ठेकेदारांना (contractors) कामे केल्यानंतर कामांची बिले (bills) देण्यासाठी जिल्हा परिषदेत (zilha parishad) कार्यान्वित असलेल्या पीएमएस प्रणालीने (PMS system) पुन्हा एकदा मान टाकली आहे.

एन दिवाळी सणाच्या (diwali festival) तोंडावर असा प्रकार घडला असल्यामुळे ठेकेदारांमध्ये विशेषतः सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांमध्ये (educated unemployed engineers) नाराजीचा सूर आहे.

मागील महिन्यात तब्बल २० दिवस प्रणाली ठप्प झालेली असताना, सोमवारी (दि. १७) सकाळपासून ही प्रणाली पुन्हा एकदा ठप्प झाली. पीएमएस (PMS) या प्रणालीची सेवा पुरविणाऱ्या सीडॅक (Cedac) या कंपनीशी करार संपुष्टात आला असून, शासनाकडून कराराचे नूतनीकरण न केल्याने ही प्रणाली बंद करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रणाली बंद झाल्याने ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

ठेकेदारांची देयके वेळेत मिळण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या (Rural Development Department) अंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्हा परिषदांमध्ये (zilha parishad) ठेकेदारांनी केलेल्या कामांचे मोजमाप (Measurement of works) व त्यांची बिले तयार करण्यासाठी पीएमएस ही प्रणाली वापरली जाते. ग्रामविकास विभागाने ही प्रणाली सीडॅक या संस्थेकडून घेतलेली आहे. या प्रणालीनुसार काम करताना बिलांची प्रत्यक्ष फाइल तयार केली जाते. तसेच, त्या फाइलमधील सर्व मजकूर आॅनलाइन पद्धतीने पीएमएस प्रणालीतही (PMS system) नोंदवला जातो. कामे वेळेत होऊन ठेकेदारांना बिले वेळेत मिळावीत, हा प्रणालीचा उद्देश आहे.

नाशिक जिल्हा परिषद (Nashik Zilha Parishad) वगळता राज्यभरात या प्रणालीद्वारे बिले देण्याचे काम बंद असून, ते आॅफलाइन पद्धतीने सुरू आहे. मात्र, ग्रामविकास विभागाला (Rural Development Department) पीएमएस या प्रणालीची सेवा पुरवणाऱ्या सी डॅक या कंपनीचे बिल थकवल्यामुळे त्यांनी ही सेवा सप्टेंबर महिन्यात तब्बल २० दिवस बंद केली होती. त्यामुळे ठेकेदारांची ५० कोटींहून अधिक रकमेची बिले अडकली होती.

यानंतर ठेकेदारांनी (contractors) ओरड केल्यानंतर, शासनाने सी डॅक कपंनीस करार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर, कंपनीने ही प्रणाली पूर्ववत सुरू केली. परंतु, १५ दिवस उलटून देखील शासनाने कराराचे नूतनीकरण न केल्याने कंपनीने पीएमएस प्रणाली बंद केली आहे. प्रणाली बंद झाल्याने सोमवारी सकाळपासून बिले काढण्याचे काम ठप्प झाले आहे. दिवाळी सणाच्या (diwali festival) पार्श्वभूमीवर, ठेकेदारांकडून बिले काढण्यासाठी गर्दी होत आहे. यातच प्रणाली बंद झाल्याने ठेकेरादांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दिवाळी व अन्य सण तोंडावर आल्याने ठेकेदारांना बिले वेळेत मिळावीत, यासाठी त्यांच्याकडून तगादा लावला जात आहे. पीएमएस प्रणाली पूर्ववत सुरू होईपर्यंत आॅफलाइन बिले देण्यास परवानगी मिळावी, असा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. शासनाकडून निर्णयाची प्रतीक्षा आहे.

- ऋषीकेश गरुड, नोडल अधिकारी, पीएमएस प्रणाली जि.प.

पीएमएस प्रणाली वारंवार अडथळे येत असून, बंद सिस्टीममुळे बिले रखडली आहेत. ही प्रणाली केवळ नाशिक जिल्हा परिषदेतच सुरू असून, ती तत्काळ बंद करावी; अन्यथा जिल्हा परिषदेवर आंदोलन केले जाईल.

- विनायक माळेकर, कोषाध्यक्ष, महाराष्ट्र इंजिनिअरिंग असो. नाशिक शाखा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com