बनावट कागदपत्राद्वारे प्लॉट बळकावला
नाशिक

बनावट कागदपत्राद्वारे प्लॉट बळकावला

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

बनावट कागदपत्र तसेच त्याद्वारे विशेष मुखत्यापत्र तयार करून एकाचा 218 चौरस मिटरचा प्लॉट दोघांनी बळकवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इमरान अय्युब तांबोळी (पंचशीलनगर, नाशिक) व समाधान दिलीप सोनवणे (रा. देवळ, जि. जळगाव) अशी फसवणुक करणार्‍या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी भालचंद्र वनजी वाणी (रा. इंदिरानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार वाणी यांची गंगापूर शिवारात सर्व्हेनंबर 58 मध्ये 82 क्रमांकाचा 278 चौरस मिटरचा प्लॉट आहे.

संशयितांनी वाणी यांचे आधार व पॅनकार्डच्या फोटोंच्या सहाय्याने बनाट व्यक्ती वाणी हीच आहे असे भासवून दुय्यम निंबंधकांकडे बनावट विशेष मुखत्यारपत्र तयार करून प्लॉट बळकवून फसवणुक केली.

याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरिक्षक पाटील करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com