मातोरीच्या पिंगळे परिवाराचा आदर्श; आईच्या दशक्रियेनिमित्त राबविला 'हा' उपक्रम

मातोरीच्या पिंगळे परिवाराचा आदर्श; आईच्या दशक्रियेनिमित्त राबविला 'हा' उपक्रम

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा परिषदेचे (Zilla Parishad) उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे (Anandrao Pingale) यांच्या मातोश्री सावित्रीबाई पोपटराव पिंगळे यांचे ५ मे रोजी ८९ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले होते....

त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, तीन बहिणी व जावई असा परिवार आहे. या सगळ्यांनी एकमताने निर्णय घेत दशक्रिया विधीनिमित्त पारंपरिक कार्यक्रमांना फाटा देत दहाव्याच्या दिवशी शंभर रक्त पिशव्या संकलन (Collection of blood bags) करण्याचा संकल्प केला.

यासाठी रक्तदान शिबिराबरोबरच कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम (Vaccination campaign) आयोजित करण्याचे पिंगळे कुटुंबीयांनी ठरविले. यासाठी मातोरी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातच दहाव्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात संदर्भ सेवा रुग्णालयाची शासकीय रक्तपेढी व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने रक्तदान शिबिर व कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवण्यात आली.

दरम्यान, कार्यक्रमासाठी आलेले ग्रामस्थ, पिंगळे कुटुंबीयांचे आप्तेष्ट , मित्र आणि जिल्हा परिषदेचे सेवक,ग्रामसेवक,आरोग्य सेवक व अधिकारी तसेच WMO चे सदस्य यांनी रक्तदान केले.

त्याचबरोबर अनेक ग्रामस्थांनी कोविड १९ प्रतिबंधात्मक लस घेतली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Leena Bansod) यांनी या कार्यक्रमाप्रसंगी भेट देत रक्तदान आणि कोविड लसीकरण आयोजित केल्याबद्दल पिंगळे कुटुंबीयांचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सरपंच दीपक हगवणे, उपसरपंच मनीषा रोकडे, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, वर्षा फडोळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, गट विकास अधिकारी डॉ. सारिका बारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश निकम, वैद्यकीय अधिकारी डॉ अमित पाटील, डॉ. पुरी यांनी परिश्रम घेतले.

रक्तदान करत आईला मुलाची श्रद्धांजली

दशक्रिया विधीनिमित्त रक्तदानाचे आवाहन करत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे यांनी स्वतः तसेच पत्नी जयश्री यांनी रक्तदान करत आईला श्रद्धांजली वाहिली. दशक्रिया विधी निमित्त पारंपरिक पद्धतींना फाटा देत रक्तदान शिबिर व कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम हा उपक्रम राबवल्यामुळे पिंगळे कुटुंबीयांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Stories

No stories found.