पत्रकाराची लेखणी म्हणजे भवानी तलवार

धर्मादाय आयुक्त झपाटे यांचे गौरव समारंभात प्रतिपादन
पत्रकाराची लेखणी म्हणजे भवानी तलवार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पत्रकारिता Journalism म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकाराच्या लेखणीत बदल घडविण्याची ताकद असते. त्यामुळे आजच्या काळात पत्रकारांची लेखनी स्वराज्यातील भवानी तलवारीपेक्षा कमी नसल्याचे मत नाशिक विभागाचे धर्मादाय आयुक्त ज. पां. झपाटे Charity Commissioner J.P. Jhapate यांनी व्यक्त केले.

कालिका देवी संस्थान Kalika Mandir Trust , अखिल भारतीय मराठा सेवा संघा व क्रीडा संस्कृती फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने मराठी पत्रकार दिनाच्याMarathi Journalist's Day पार्श्वभूमीवर पत्रकार गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. त्यांच्या हस्ते विविध माध्यमांच्या प्रतिनिधींच्या सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कालिका देवी संस्थानचे अध्यक्ष अण्णा पाटील होते. झपाटे पुढे म्हणाले की, पत्रकारामध्ये समाजात बदल घडविण्याची ताकद असते. नेहमीच वेगवेगळे प्रश्न त्याच्या लेखणीने मांडण्याचे काम पत्रकार करत असतो. आज अनेक पत्रकार विनावेतन काम करून आपले कर्तव्य बजावत आहेत. आर्थिक अडगळीच्या काळात अनेक पत्रकारांसह सर्वांनाच आर्थिक संकटातून जावे लागले.

ही परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. पत्रकार बर्‍याचदा सामाजिक कामातून आपली ओळख निर्माण करत असतो. कागदोपत्री काही नसले तरी तो त्याच्या परीने सामाजिक बांधिलकी जपत असतो. हे काम खूप मोठे आहे, त्याची व्याप्ती वाढवायची असेल तर पत्रकारांनी सामाजिक संस्था काढावी, त्यातून सामाजिक मदत समाजापर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, यातून रोजगार अनेकांना उपलब्ध होईल आणि समाजाच्या तळागाळापर्यंत मदत पोहोचण्यास मदत होईल असेही याप्रसंगी झपाटे म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com