लसीकरणाचा वेग मंदावला

लसीकरणाचा वेग मंदावला

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरात करोनाच्या ( Corona ) तिसर्‍या लाटेच्या भितीने लोकांनी मोठ्या प्रमाणावर तासंतास रांगेत उभे राहून पहिला व दुसरा डोस घेतला. करोनाचा प्रभाव कमी झाल्याने सध्या लसीकरणाचा ( corona Vaccination )वेग मंदावला असल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे.

शहरात लसीकरणासाठी 34 लसीकरण केंद्र असून आत्ता पर्यंत 18 वर्षावरील 15 लाख 12 हजार 767 लोकांनी डोस घेतला असून पहिला डोस 13 लाख 89,330 लोकांनी तर दुसरा डोस 11 लाख 12,137 लोकांनी घेतला आहे.

तर बुस्टर डोस 52956 लोकांनी घेतला आहे. 12 ते 14 वयोगटातील 39937 मुलांना पहिला तर 13019 मुलांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 15 ते 17 वयोगटातील 90383 मुलांना डोस देण्यात आला असून त्यात पहिला डोस 56765 मुलांनी पहिला तर 31942 मुलांनी दुसरा डोस घेतला आहे.

आठवडा भरापासून दिवसाची करोना रुग्णसंख्या कमी असल्याने नागरिकांमधील भिती देखील कमी झाली असल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे.

Related Stories

No stories found.