जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढणार

592 केंद्रे सुरू
जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

देशात 100 टक्के लसीकरण Corona Vaccination व्हावे या उद्देशाने केंद्र सरकारच्या ‘हर घर टिका हर घर दस्तक’ मोहीम तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 नोव्हेंबरअखेर 100 टक्के लसीकरणाचे दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग ZP Health Dept कामाला लागला आहे. लसीकरणाची गती वाढावी यासाठी सोमवारपासून आरोग्य विभागाने शहरासह ग्रामीण भागात 592 लसीकरण केंद्रे vaccination Centers कार्यन्वित केली आहेत.

लसीकरण न झालेल्यांची यादी तयार करून आशा सेविकांना दिली जाणार असून त्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन लसीकरण केले जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी दिली.

कोविड लसीकरण शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर टीका, हर घर दस्तक’ या मोहिमेची घोषणा केली आहे. या मोहिमेंतर्गत प्रत्येक गावातील लसीकरणापासून वंचित राहिलेल्या लोकांची यादी तयार करून त्यांचे लसीकरण केले जाणार आहे. नाशिक जिल्ह्यात या मोहिमेचा शुभारंभ केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी या वाडीतील घरांमध्ये जाऊन लसीकरण करून झाला. दुसरीकडे, येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत 100 टक्के करोना लसीकरण करावे, असे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना दिले आहेत.

त्यामुळे लसीकरण मोहिमेला सोमवारपासून प्रारंभ झाला. यात प्रामुख्याने जिल्ह्यात एकही डोस न घेतलेले किती जण आहेत, दुसरा डोस किती जणांचा राहिला आहे याची यादी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यातील 100 जणांची यादी आशा सेविकांना दिला जाणार असून त्या घरोघरी जाऊन लसीकरण करतील. त्यासाठी 592 लसीकरण केंद्रे उभारण्यात आले आहेत. याद्वारे आदिवासी पाड्यांवरील ग्रामस्थ, लस घेण्यासाठी टंगळमंगळ करणार्‍यांचे प्रोत्साह वाढवून त्यांना लस घेण्यासाठी तयार करणार असून घरोघरी लसीकरण होईल, असा विश्वास डॉ. कपिल यांनी व्यक्त केला.

आदिवासींवर लक्ष केंद्रित

दरम्यान, आदिवासी तालुक्यात लसीकरणाचा वेग कमी आहे. यासाठी सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, कळवण तालुक्यात लसीकरण वाढावे याकरता लक्ष केंद्रित केले जाणार आहे. गत दोन ते तीन महिन्यांपासून या भागातील आदिवासी कामांनिमित्त स्थलातंरीत झालेले होते. दिवाळीनिमित्त हे पुन्हा घरी आलेले आहेत. त्यामुळे या भागात विशेष मोहीम राबवून लसीकरण करून घेण्याबाबत नियोजन केल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी सांगितले.

नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांसाठी 22 ऑक्टोबर अखेर कोव्हॅक्सिन 15, 99, 370 डोसेस आणि कोविशिल्ड 1,17,61,820 डोसेस शासनाकडून प्राप्त झाले होते. या दोन प्रकारच्या लसींचे एकूण 1,33,61,190 डोसेस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी विभागात 1, 29, 34, 893 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण 45 लाख 12 हजार 691 जणांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 32 लाख 90 हजार 262 जणांनी पहिला डोस घेतला असून 12 लाख 22 हजार 429 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com