देशात मोदींमुळे विकासाची गतीः आ. फरांदे

देशात मोदींमुळे विकासाची गतीः आ. फरांदे

मनमाड । प्रतिनिधी Manmad

केंद्रात जेंव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले तेंव्हापासून देशात सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली असून आगामी काळात देखील प्रगती सुरूच राहणार आहे, असे प्रतिपादन नाशिकच्या भाजपा (bjp) आ. देवयानी फरांदे (mla Devyani Farande) यांनी केले.

देशाच्या स्वातंत्र्याचा (Independence) अमृत महोत्सवानिमित्त एफसीआयमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला फरांंदे उपस्थित होत्या त्यावेळी त्याबोलत होत्या. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकर, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, नाशिक मनपाच्या महिला व बाल कल्याण सभापती स्वाती भामरे, एफसीआयच्या मनमाड डेपोचे प्रबंधक बी.एम. राऊत आदी उपस्थित होते.

आ. फरांदे पुढे म्हणाल्या की करोना (corona) काळात लॉकडाऊनमध्ये (Lockdown) कोणावरही उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना लाभार्थी योजना (Poor Welfare Food Scheme Beneficiary Scheme) सुरु करून त्या अंतर्गत कोट्यावधी नागरिकांंना मोफत धान्य वाटप (Free grain distribution) केले. धान्य वाटप करण्याची जबाबदारी एफसीआयवर सोपविण्यात आली होती.

या विभागाने ही जबाबदारी चोखपणे पार पाडल्याबद्दल आ. फरांदे यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी भारत सरकारच्या खाद्य विभागाच्या (Food Department) प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, अंत्योदय योजना, अन्नपूर्णा योजना, संपूर्ण ग्रामीण योजना, मध्यान्न भोजन योजना, फॉरटीफाईड राईस आदी योजनांची माहिती दिली.

नितिन मुंढावरे यांनी 75 वे आझादी का अमृत महोत्सव, स्वतंत्र भारतात झालेले अन्न धान्य उत्पादन पुरवठाबद्दल मार्गदर्शन केले. जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकर, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, एफसीआयच्या मनमाड डेपोचे प्रबंधक बी.एम. राऊत यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते एफसीआयच्या आवारात वृक्षारोपण (Plantation) करण्यात आले.

सूत्रसंंचालन हिमांशू सिघल आणि वैष्णवी लकडे यांनी तर संयोजन बी.एम. राऊत, के.एल.वाघ, ए.पी. महाजन, पी.एस.मिश्रा, अजय राऊळ, शेखर घोडके, तुषार गुंजाळ, प्रदीप दातीर, कैलाश शर्मा, पूजा सिंह, सतेंद्रप्रताप सिंह, प्रदीप मारकंडे, रवी बरकुले, देवा वांजे आदीसह इतरांनी केले. कार्यक्रमाला सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर भाजप जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, नितीन परदेसी, एकनाथ बोडखे, बुढन शेख, आनंद बोथरा यांनी आ. देवयानी फरांदे यांची भेट घेवून त्यांचा सत्कार केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com