प्राणवायू प्रकल्पामुळे रुग्णांचे जीव वाचणार

आमदार माणिकराव कोकाटे यांचे प्रतिपादन
प्राणवायू प्रकल्पामुळे रुग्णांचे जीव वाचणार

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

आगामी काळात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचे संकेत (third wave of corona) मिळत असून कोरोनाचे नियम (Corona's rules) पाळून संसर्ग टाळता येईल. मात्र, तिसर्‍या लाटेचं (third wave) संकट आलंच तर त्याचा सामना करण्यासाठी ऑक्सिजन प्रकल्पाने (Oxygen project) रुग्णांना जीवदान मिळण्यासोबत आरोग्य विभागाला (Department of Health) बळ मिळेल असे प्रतिपादन आमदार माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate) यांनी केले.

ग्रामिण उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात आमदार कोकाटे यांच्या प्रयत्नातून व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांच्या सहकार्याने जिल्हा नियोजन मंडळाच्या (District Planning Board) निधीतून साकारण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन (Inauguration of Oxygen Generation Project) आ. कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड (NCP District President Kondajimama Awhad), तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, तहसीलदार राहुल कोताडे, वैद्यकीय अधिक्षिका डॉ. वर्षा लहाडे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, मेघा दराडे, जयराम शिंदे, पंकज जाधव, नगरसेविका शितल कानडी उपस्थित होते.

उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या लोकार्पणाची वाट न बघता या इमारतीत लोकसहभागातून साहित्य मिळवून डेडीकेटेड कोवीड केअर सेंटर (Covid Care Center) सुरु करुन तालुक्यातील हजारो रुग्णांना मृत्यूच्या दारातून बाहेर काढण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले. मात्र, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे (Oxygen deficiency) काही रुग्णांना सुविधा देताना अडचणी आल्या.

त्यामुळे यापुढे ऑक्सिजन अभावी कोणीही रुग्ण दगावू नये म्हणून आपण उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी ना. भुजबळ यांच्याकडे पाठपुरावा करीत 120 रुग्णांना 24 तास पुरेल एवढी क्षमता असलेला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प (Oxygen production project) मंजूर करुन आणला. कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेत आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, सेविकांनी झोकून देऊन काम केले. तसेच कार्यकर्त्यांनीदेखील जिवाची पर्वा न करता केलेली रुग्णसेवा अतुलनिय असल्याचे त्यांनी सांगितले.

दहा ग्रामपंचायतींना रुग्णवाहिका

पहिल्या व दुसर्‍या लाटेत ग्रामिण भागातील रुग्णांना उपचारासाठी आणण्यासाठी अडचण निर्माण होत होती. त्यामुळे अनेक अत्यवस्थ रुग्णांना जीवही गमवावा लागला होता. त्यामुळे आता तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभुमीवर पुढील काळात तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असणार्‍या दहा ग्रामपंचायतींना रुग्णवाहीका देण्याची ग्वाही आ. कोकाटे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com