सापडलेले स्त्रीधन केले पोलिसांच्या स्वाधीन

सापडलेले स्त्रीधन केले पोलिसांच्या स्वाधीन

नाशिक | प्रतिनिधी Nashik

इंदिरा नगर पोलीस ठाण्यात Indira Nagar Police Station पोलीस निरीक्षक म्हणून कामगिरी केलेल्या नारायण न्याहाळदे यांच्या पत्नीला सापडलेले स्त्रीधन त्यांनी गंगापूर Gangapur Police Station पोलीस ठाण्यात सुपूर्द केले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्पना नारायण न्याहाळदे Kalpana Nyahlde( ४३, रा. फ्लॅट नंबर ४०२,सिध्दी पुजा ग्लोरी अपार्टमेंट, निर्मला कॉन्व्हेंट शाळेजवळ, गंगापूर रोड ) हया सकाळी आकाशवाणी भाजी मार्केट Aakashwani Market येथे भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना रस्त्यावर खाली एक मंगळसुत्र पडलेले दिसले.

यावरून त्यांनी त्यांचे पती शिर्डी येथे वाहतूक शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले नारायण न्याहाळदे यांना फोन वरून सदर घटनेची कल्पना दिली असता त्यांनी सदर मंगळसुत्र गंगापूर पोलीस ठाण्यात देण्यास सांगितले.

यावरून कल्पना यांनी सदर सोन्याचे मंगळसुत्र गंगापूर पोलीस ठाण्याचे वपोनी रियाज शेख यांना सुपूर्द केले. यावेळी गंगापूर पोलीस ठाण्यातर्फे वपोनी शेख यांनी त्यांचा सत्कार केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com