आमचे फक्त एकच साहेब - मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर

आमचे फक्त एकच साहेब - मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

पोलीस आयुक्तांनी ( Commissioner of Police )काय आदेश दिले आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही आमच्यासाठी मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांचा आदेश महत्वाचा (MNS chief Raj Thackeray's order is important )असल्याचे मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर (MNS city president Dilip Datir )यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांनी परिपत्रक जारी करून मशिदीच्या १०० मिटर आवारात व अजानच्या वेळांत १५ मिनिटे आधी व नंतर हनुमान चालिसा पठण करता येणार नाही व ३ मे पर्यंत भोंगे ( Loud Speakers )लावण्यासाठी पोलीस आयुक्तांची परवानगी घ्यावी असा अध्यादेश प्रारित केला. यावर मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी आक्रमक पवित्रा घेत राज ठाकरे यांनी १२ एप्रिलच्या सभेत राज्य सरकारला ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे त्यावर आम्ही कायम आहोत.

जर तो पर्यंत भोंगे उतरवले गेले नाही तर ज्या आवाजात मशिदीवरील भोंगे वाजतील त्याच्या दुप्पट आवाजाने आम्ही हनुमान चालीसा लावू असा ईशारा दिला. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश राज्य सरकार व पोलीस पाळत नसतील तर आम्ही त्याच्या कडे लक्ष देत नाही.

आमच्या दृष्टीने आदेश फक्त राज ठाकरे यांचा त्याव्यतिरिक्त आम्ही कुणाचे आदेश पाळत नाही असेही दातीर यांनी सांगितले. कायदा हा सर्वांसाठी समान आहे व नियम हे सर्वांना सारखेच असले पहिजे. त्यामुळे जर त्यांना जर आम्हाला दंड करायचा असेल आणि तुरुंगात टाकायचे असेल तर खुशाल टाका आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत असेही दातीर यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.