जिल्ह्यात सशस्त्र सेना ध्वजनिधीचे 'इतके' उद्दिष्ट पूर्ण

जिल्ह्यात सशस्त्र सेना ध्वजनिधीचे 'इतके' उद्दिष्ट पूर्ण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

'हाच संकल्प हिच सिद्धी’ या संकल्पनेतून जिल्ह्यातील सशस्त्र सेना ध्वजनिधी 2021 साठी जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मदत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Gangatharan D.) यांनी केले होते...

त्यानंतर सशस्त्र सेना ध्वजनिधीचे डिसेंबर 2022 अखेरपर्यंत करावयाचे उद्दिष्ट जून 2022 मध्ये 200 टक्के पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्पनंट कमांडर ओंकार कापले (Omkar Kaple) यांनी दिली आहे.

या संदर्भात जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात कापले यांनी म्हटले आहे की, सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा (Fund) उपयोग माजी सैनिक, युद्ध विधवा, माजी सैनिक विधवा व त्यांचे अवलंबिंतांसाठी महाराष्ट्र शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांकरीता करण्यात येतो.

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2021 संकलित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) नाशिक जिल्ह्यास रूपये 1 कोटी 38 लाख 37 हजार इतके उद्दिष्ट 8 डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेशित केले होते.

त्यासाठी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Gangatharan D.) यांनी आवाहन केल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिल्याने हे उद्दिष्ट जून 2022 अखेर 200 टक्के पर्यंत पूर्ण झाले आहे.

उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार

देशाच्या संरक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या माजी सैनिक, युद्ध विधवा, माजी सैनिक विधवा व त्यांचे अवलंबितांसाठी सहकार्य करणे, हे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे. या जाणीवेतून आवाहन केल्यानंतर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांनी जो उस्फुर्त प्रतसिाद दिला त्याबद्दल सर्व सरकारी, निमसरकारी अधिकारी व कर्मचारी यांचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी आभार व्यक्त केले आहे.

- गंगाधरन डी., जिल्हाधिकारी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com