नाशिकरोडला लसीकरण केंद्र संख्येत वाढ होणार

नाशिकरोडला लसीकरण केंद्र संख्येत वाढ  होणार

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

नागरिकांच्या वाढत्या मागणीनुसार नाशिक रोड परिसरात प्रभाग क्रमांक 21 व 22 या ठिकाणी आणखी तीन नवीन लसीकरण केंद्र सुरू होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

नाशिकरोड भागात नवीन लसीकरण केंद्र सुरू व्हावे म्हणून नागरिकांची मागणी होती. या मागणीची दखल घेत प्रभाग क्रमांक 22 मध्ये असलेल्या विहितगाव येथील माऊली हॉल शेजारी शाळा क्रमांक 64 या ठिकाणी नवीन लसीकरण केंद्र पाच जुलै पासून सुरू होणार आहे. प्रभागाच्या नगरसेविका सुनीता कोठुळे यांनी आयुक्तांना यासंदर्भात पत्र दिले होते.

या पत्राची दखल घेऊन सदर ठिकाणी केंद्र सुरू करण्याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर यांना सूचना केली होती. त्यानंतर डॉ. धनेश्वर तसेच विभागीय अधिकारी संजय गोसावी यांनी सदर ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व 5 तारखेपासून लसीकरण केंद्र सुरू करणार असल्याचे आश्वासन त्यांनी नगरसेविका सुनीता कोठुळे व ज्येष्ठ शिवसैनिक उत्तम कोठुळे यांना दिले.

या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. त्याचप्रमाणे याच प्रभागातील देवळालीगाव येथे आठवडे बाजार येथील मनपा शाळेत लसीकरण केंद्र सुरू होणार आहे. या ठिकाणी सुद्धा वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर यांनी भेट देऊन पाहणी केली.

याप्रसंगी नगरसेवक सूर्यकांत लवटे, केशव पोरजे, उत्तम कोठुळे, विकास गीते, किरण डहाळे, गणेश बनकर, चंदू महानुभाव, मंगेश लांडगे आदी उपस्थित होते. तसेच प्रभाग क्रमांक 21 मध्ये असलेल्या शाळा क्रमांक 125 मध्ये सुद्धा लसीकरण केंद्र सुरू होणार आहे. या केंद्राची पाहणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी केली. याप्रसंगी नगरसेविका ज्योती खोले, रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे, श्याम खोले, प्रताप मेहरोलिया आदी उपस्थित होते.

लसीकरणाचे नियोजन करावे : कटारिया

देवळाली कॅम्प येथील कॅन्टोमेंट हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या लसीकरणाचे योग्य असे नियोजन करावे. जेणे करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही, अशी मागणी बोर्डाचे माजी उपाध्यक्ष भगवान कटारिया यांनी केली आहे. कॅन्टोमेंट जनरल हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर असून एका बाजूला लसीकरण केले जात आहे. त्यात 18 ते 44, 45 ते 60 व जेष्ट नागरिक असे तीन टप्प्यात लसीकरण केले जाते.

जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध होणार्‍या लसीचे डोस अतिशय कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने त्याचे वाटप करताना हॉस्पिटल स्टाफ व नागरिक यांच्यात वादावादी होत आहे. यासाठी कटारिया यांनी कॅन्टोमेंटचे सीईओ यांना पत्र लिहून लसीकरणाचे नियोजन करणे आवश्यक असून कोणताही गोंधळ न उडाता सर्व लसीकरण प्रकिया सुरळीत पार पडेल, अशी मागणी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com