करोनाची पालकांना धास्ती; शाळांमधील विद्यार्थी संख्येत घट

करोनाची पालकांना धास्ती; शाळांमधील विद्यार्थी संख्येत घट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यासह जिल्ह्यातही करोनाचा (Corona) प्रादुर्भाव पुन्हा वाढला असून रुग्णांची संख्या तीन दिवसात पुन्हा एकदा वाढली आहे. या वाढत्या करोना रुग्णांमुळे पालकांनी धास्ती घेतली असून, आपल्या पाल्यांना शाळांमध्ये (Schools) पाठविण्यास नकार दिला आहे...

यामुळे ग्रामीण भागातील (Rural Area) शाळांमधील विद्यार्थ्यांची (Students) संख्या घटल्याचे चित्र आहे. आता शाळा बंद होणार, अशा चर्चांना उधान आल्याने संस्था चालकदेखील संभ्रमावस्थेत आहेत.

करोनाबाधितांची संख्या वाढत असताना शाळांमध्येही करोनाने शिरकाव झालेला आहे. त्यामुळे पालकही धास्तावले आहेत.मागील तीन ते चार दिवसांपासून करोना रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. मंगळवारी (दि.४) ३२२ नवे करोनाबाधित सापडले आहेत.

हा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याचे धाडस करत नसल्याचे चित्र आहे. परिणामी शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी झाली आहे. दुसरीकडे मुंबई, ठामे, पुणे शहरातील शाळा बंद करण्याचा निर्णय तेथील स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील शाळा बंद होण्याची मागणी पालकवर्गाकडून होऊ लागली आहे.

मागील महिन्यात महानगरपालिका, खासगी शिक्षण संस्थांच्या मराठी माध्यमाच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. मात्र, इंग्रजी माध्यम शाळा बंद होत्या. काही शाळा सुरू झालेल्या दिसत असल्या तरी अवघे तीन तास विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शिकविले जाते.

नाताळच्या सुट्यांमुळे शहरातील बहुतांश इंग्रजी माध्यम शाळा सोमवार (दि.३) पासून सुरू झाल्या. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याची मानसिकता तयार झालेली असली तरी ओमायक्रॉनची (Omicron) धास्ती पालकांच्या मनात होती. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले नसल्याचे दोन दिवसातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवरून समोर आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com