करोना अपडेट
करोना अपडेट
नाशिक

जिल्ह्यात पॉझिटिव्हचा आकडा २१ हजार ८३९ वर

मागील २४ तासात ७६३ नवे रूग्ण

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

नाशिक शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरूच असून दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 763 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्ताचा आकडा 21 हजार 839 इतका झाला आहे. तर आज ग्रामिण भागातील आकड्याने 5 हजाराचा टप्पा ओलांडला आहे.

आज रात्रीपर्यंत जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार आज दिवसभरात एकुण 763 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 484 रूग्ण आहेत. यात शहरातील नवीन नाशिक, नाशिकरोड, पंचवटी, सातपुर गाव, उपनगर, नाशिकरोड, इंदिरानगर, पेठरोड, जुने नाशिक, वडाळारोड येथील रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे नाशिक शहराचा आकडा 14 हजार 811 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 227 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 5 हजार 169 झाला आहे. यामध्ये सर्वाधिक येवला, इगतपुरी, सिन्नर, सुरगाणा, इगतपुरी, नांदगाव, विंचुर, वणी, पिंपळगाव बसवंत, रावळगाव, उमराळे, भगुर, त्र्यंबकेश्वर, घोटी, देवळाली कॅम्प येथील रूग्ण आहेत. मालेगावत पुन्हा करोनाने डोके वर काढले आहे. आज 52 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे मालेगावचा आकडा 1 हजार 676 झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा 183 झाला आहे.

आज दिवसभरात जिल्ह्यातील 521 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 16 हजार 382 वर पोहचला आहे. आज करोनामुळे 24 तासात 16 रूग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 10 नाशिक शहरातील असून ग्रामिण भागातील 5 तर मालेगाव येथील 1 रूग्णाचा सामावेश आहे.

करोना रूग्ण वाढत असतानाच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा मात्र वाढत चालला असून आज एकाच दिवसात नव्याने विक्रमी १ हजार ६७८ संशयित रूग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये शहरातील सर्वाधिक 1 हजार 23 तर ग्रामिण जिल्ह्यातील व गृहविलगीकरणातील 616 आहेत. जिल्हा रूग्णालय ७, मालेगाव १९, डॉ. वसंतराव पवार रूग्णालय १९ यांचा समावेश आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित: 21,839

* नाशिक : 14,811

* मालेगाव : 1,676

* उर्वरित जिल्हा : 5,169

* जिल्हा बाह्य ः 183

* एकूण मृत्यू: 648

* करोनामुक्त : 16,382

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com