Corona
Corona
नाशिक

जुन महिन्यात करोना बाधीत मृतांचा आकडा ९६

जुलैत मृतांची संख्या दीडपट होण्याची भिती

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शासकिय यंत्रणांकडुन जुलै महिन्यात करोना रुग्णांचा आकडा मोठ्या वेगाने वाढण्याचे भाकीत शासकिय यंत्रणांनी केले असुन बाधीतांच्या वाढत्या आकड्याबरोबर मृतांचा आकडा दीडपड होण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे. केवळ जुन महिन्यात ९६ करोना बाधीतांचा मृत्यु झाला होता. आता जुलैच्या १६ दिवसात ७८ जणांचा करोनामुळे मृत्यु झाला असुन दररोज ५ ते ६ जणांचा मृत्यु होत आहे. यामुळे जुनच्या तुलनेत जुलै अखेरपर्यत मृतांचा दुप्पट किंवा दीडपट आकडा होण्याची शक्यता आहे.

नाशिक शहरातील करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत आता याकडे शासनाचे लक्ष लागले आहे. अनेक उपाय योजना करुनही बाधीतांचा अकडा कमी होत नाही, याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेला ज्योतीबा फुले जीवनदायी योजना आयुक्त व महाराष्ट्र राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ. सुधाकर शिंदे यांनी भेट देऊन माहिती घेतली. त्यांनी नाशिक महापालिका क्षेत्रात करोनाचा संसर्ग आणखी वाढल्याची शक्यता वर्तवित यानुसार आता शहर व जिल्ह्यात खाटांची संख्या वाढविण्याची सुचना प्रशासनाला केली आहे.

नाशिक शहरात रुग्णसंख्या पुढच्या काळात वाढण्याची शक्यता असुन याचबरोबर रुग्णाच्या मृत्युचा आकडा वाढणार आहे. शहरात ६एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर एप्रिल व म या महिन्यात केवळ करोनामुळे ९ जणांचा मृत्यु झाला होता. नंतर जुन महिन्यात मृताचा दहा पटीने वाढला जाऊन या महिन्यात ९६जणांचा करोनामुळे मृत्यु झाला. नंतर आता जुलै महिन्याच्या सोळा दिवसात ७८ जणांचा मृत्यु झाला आहे. आता प्रतिदिन चार ते पाच जणांचा मृत्यु होऊ लागला आहे. यावरुन जुलै महिना अखेर मृतांचा आकडा दुप्पट किंवा दीडपट होण्याची भिती आता व्यक्त केली जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com