करोना अपडेट
करोना अपडेट
नाशिक

जिल्ह्यात करोनाग्रस्तांची संख्या ६५१९ वर

चोवीस तासात २१४ पॉझिटिव्ह रूग्ण

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

नाशिक शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरूच असून आज चोवीस तासात जिल्ह्यात २१४ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात एकट्या नाशिक शहरातील १२५ आहेत यामुळे शहरातील रूग्णांची संख्येने ३ हजार ७६० झाली आहे. तर जिल्ह्यात करोनाग्रस्तांची एकुण संख्या ६ हजार ५१९ झाली आहे. एकाच दिवसात जिल्ह्यातून ५७७ नवे संशयित दाखल झाले आहेत. आज शहरासह जिल्ह्यातील ६ रूग्णांचा मृत्यू झाल्याने करोना बळींची संख्या ३१२ झाली आहे. तर एकाच दिवसात २११ रूग्णांनी करोनावर मात केली आहे.

आज रात्रीपर्यंत जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार आज दिवसभरात एकुण २१४ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये शहरातील १२५ रूग्ण आहेत. यात शहरातील पंचवटी हिरावाडी, पेठरोड , जुने नाशिक, म्हसरूळ, आडगाव, नाशिकरोड येथील रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे नाशिक शहराचा आकडा ३ हजार ७६० वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील ४८ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा १ हजार ५०५ झाला आहे. यामध्ये सर्वाधिक ओझर, धारणगाव, त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, कुंदेवाडी, कसबे सुकेणे येथील रूग्ण आहेत. मालेगामध्ये आज एकच रूग्ण पॉझिटिव्ही आला आहे. यामुळे मालेगावचा आकडा १११८ झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा १३६ वर स्थिर आहे. तर करोनामुळे आज ६ जणांचा मत्यू झाला. यामध्ये सर्व नाशिक शहरातील आहेत. यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा ३१२ झाला आहे. आज दिवसभरात जिल्ह्यातील विक्रमी २११ रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा ४ हजार ०४७ वर पोहचला आहे. हा प्रशासनास मोठा दिलासा आहे.

करोना रूग्ण वाढत असतानाच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा वाढत चालला असून आज एकाच दिवसात नव्याने तब्बल 577 संशित रूग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये नाशिक शहरातील ३११ आहेत. जिल्हा रूग्णालय २०, ग्रामिण २१०, मालेगाव २७, डॉ. वसंतराव पवार रूग्णालय ९ रूग्णांचा समावेश आहे.

दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातून २७ हजार ८ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील १९ हजार ६२९ निगेटिव्ह आले आहेत.६ हजार ५१९ पॉझिटिव्ह आले आहेत. यातील २ हजार १२० रूग्ण उपचार घेत आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण कोरोना बाधित: ६५१९

* नाशिक : ३७६०

* मालेगाव : १११८

* उर्वरित जिल्हा : १५०५

* जिल्हा बाह्य : १३६

* एकूण मृत्यू : ३१२

* करोनामुक्त : ४०४७

Deshdoot
www.deshdoot.com